Wednesday, 10 December 2014

तुझी आलेली एकही हसरी स्माईलीण मी डीलीट केली 
 नाही कारण मला तेच तुझ  हास्य सदोदित ठेवायचंय, 


,बंडू मामा बिचारे २७ जून २०१४ ला रविवारी आम्ही 
आलो तर पावसात भिजत बालुशाही घेऊन आले , पाय दुखत होते तरी किती प्रेम त्यांच अन हळवा स्वभाव की त्याना गोड काही खाउ घालावच  वाटलं आम्हाला जेवणा सोबत ,माझा उपास मी तोडला कारण कोणाला मनापासून खाउ घालायची इच्छा असली आणि मी जर नाही खात म्हणून नाराज केल असत तर तुमच मन किंचित दुखावलं असत भावना नाराज केल्याने आणि त्याने मला जास्त त्रास झाला असता 

ती माझा मोबाईल पावसात  भिजू नये म्हणून तुमच्या  फ्रीजमध्ये कोथिम्बीर घालून ठेवलेली कोथिम्बीर काढून  मला   दिलेली पिशवी आजून जपली  आहे कायम जपण्यासाठी कारण ती मायेची आणि निर्मळ प्रेमाची मामीनी दिलेली आठवण आहे  ,

जीवन ही एक  पिशवीच तर आहे एक सुख -दु:खानी भरलेली , आपल मन ही एक पिशवीच तर  आहे अनमोल आठवणींची 

  ,माझे डोळे जाताना भिजलेले थोडे ,पाणावलेले…  पण पावसानी साथ दिली बाहेर पडणारया अन ते करुणामय अश्रू लपले गेले ,

,मी तुला  शनी चालीसा या करताच दिली की मला जो साडेसातीत त्रास झाला तो तुला होऊ नये  ,
 आणि तुझ्या सारख्या निर्मळ मनाच्या देवतेला तर नकोच व्हायला त्रास . 

आणि तुला त्रास तो काय ? तू स्वताहा दुसरयांच्या काळजी ने त्रस्त असतेस असो हेच तुझ विशाल मन 

आम्ही तुमच्याकडे राहिलो ना तेंव्हा मी पाचवीत असेल तर मी BADMINTON RACKET च्या उंचीचा होतो जेमतेम ,सर्व तुझ्या  त्या मैत्रिणी सौ.  कीर्ती ताई वगैरे तुमच्या घरासमोरील रोड वर ते खेळायचे  तर मी लिंबू टीम्बू  असायचो तर सर्व माझ्याशी खेळायला कंटाळायचे  पण  मला बोर वाटू नये तर BADMINTON 
खेळलीस माझ्यासोबत स्वताहा कंटाळलीस तरी ते भाव मला न दर्शवून आनंदी ठेवायला , 

तो सोनु ज्याला चिंटू ही म्हणायचो तो नितनवरे तो किती गोड ससा दिसायचा लहानपणी   

मी जीवन हे सतत अशाच साऱ्याच्या गोड आठवणी   आठवून जगतो 

तो राहुलदादा तर प्रशांत दामलेजी प्रतच निखळ हसवतो  ,मला सर्व चांगल दिलयस  देवा तू ,मला काही द्यायचच आजुन  तर हेच की  सगळे आनंदी ठेव ,ज्याने मी मला आनंदी पाहू शकेल ,कारण मलाच एकट्याला सुख मिळाली तर मी ती मनापासून नाही आस्वाद घेउ शकायचो . कोणी WHATS APP  वर मी पाठवलेला जरी जोक परत पाठवला तरी मी त्याला हसरा स्माईली पाठवून दाद देतो हसरी कारण निरागस भावनेने  तो जोक पाठवणार्याला आनंद व्हावा . 


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home