Monday, 26 October 2015

टेक केयर

रोजच्या भांडण आणि कटकटीचा कंटाळा  आला आता , वाटत संपवावं आयुष्य , अस नाही की आपण फार दुखात आहोत, जगात आपल्याहून कित्त्येक दुखी लोक आहेत. पण व्यक्ती आपल्या घराबाहेरील जगाशी लढू शकते निर्धाराने अन खंबीरपणे पण जेव्हा त्याच सर्वस्व त्याच कुटूंब त्यातच जर शुल्लक कारण वा अकारणही रोज वाद विवाद, भांडण , किरकिरी, ते जिव्हारी लागेल असे बोलणे , एकमेकांच्या खानदानाचा उद्धार  करेपर्यंत अगदी जीव नकोसा करवणारी  भांडण रोजच होऊ लागली तर हे जीवनच नको नको होऊन जात , मी तिला एक मनमोकळा गप्पांचा आधार समजलो साता जन्माकरता पण  ती न जाणो मला का इतक वाईट समजली की माझ्याशी साध बोलण  तर दूरच राहील पार वाळीतच टाकल तिनी मला , क्षणो न क्षण मरणासन्न अवस्था झालीय मनाची की असा काय गुन्हा केला मी मनमोकळ बोललो काय तर ?  तिनी अबोला काय धरला हे जगच परक वाटू लागल . ती सोडून जगात कोणीवर विश्वास नव्हता आणि नसेल म्हणून तिला मिस करू लागलो आणि कदाचित माझ्या मेल्यानंतरही करतच राहील कारण आत्मा भटकतच राहील माझा . मी हा शब्द मला नकोय , हे जग अतीव दुखानी भरलय , खूप कलहानी भरलय , कुठेही शांतता , स्तब्धता नाही . यंनीच्या जुनून अल्बमसारख चैन ईक पल नही , चैन ईक  पल नही , और कोई हल नही, say your  need  गाण्यागत मनाची अवस्था झालीय . तिच्या व्रुश्चिक राशीला आणि आईच्या तूळ  राशीला साडेसाती आहे तर शनिवारी शनीच्या मंदिरात शनी महाराजाना म्हणालो की त्यांची साडेसातीचे त्रास माझ्या वाटयाला  दे आणि त्याना सुख दे . हरेकाला वाटत की आपणच बरोबर असतो पण कधी आपण त्यांच्या जागी स्वता:ला ठेऊन  पाहावं अशी माझी मानसिकता असत आलीय , तिला तस का वाटत नसेल बर ?  कदाचित मला ती वाईट समजतही नसेल , मी माझ्याच कल्पनेत रंग भरतो स्वता:च आणि तसा विचार करतो . कधी आयुष्यात अशी वेळ येते की गाणे ऐकण नको वाटत , कोणी मित्र नको , कुठे बाहेर जाणे नको . की कोणाची संगत  नको , शांत अंधारात गप्प बसून शुन्य नजरेत जगाचा वेध घ्यावा , बाबांच्या नोकरीमुळे , बदलीमुळे कोणाची कायम अशी भक्कम साथ , आधार , ओळखीच नसायच्या , स्वताः ला सतत काही न काही कामांत व्यस्त करवूनही मनाला शांतता अशी मिळतच  नाहीये , सतत मन सैरभैर होत कशाच्या तरी शाश्वत   शांततेचा  शोध घेताय घेतंय . वाईट कोणी नाही मी सोडून , सगळे चांगले , तिनीच मला वाटत रोहन , केतनला सांगितलं असेल की अमेय एकटा  पडलाय प्लीज त्याला आधार दे , बोला त्यासोबत , ती एक पवित्र आत्मा आहे दैवी एंजल जी मनात कुढत असेल , एकांतात रडत असेल, या जगात किती अस्थिरता आहे , बेरोजगारी , शेतकऱ्याच्या आत्महत्त्या , गरीबी , घरोघर किरकिरी , शारीरिक दुखणी , सतत अशांतता , युध्द , काही लोक जे ज्ञानी आहेत कशा बाबतीत ती माहिती देताना खोचक बोलतायत , अपमान करून असुरी आनंद मिळवतात . अश्लीलता, सर्वत्र जीव गुदमरवेल  अस भयावह वातावरण . कोणी कोणाकडे न जाणे येणे , न कोणावर विश्वास ठेवावा अशी मनाची अवस्था , घालमेल . एक अनाहूत भीती समाजाची . या जगात सुख हे नाहीच , आपणच कल्पना विश्वात रमतो याकरता कशात बिझी करवून घ्याव तर त्यातही दुख , काही positive  वाचलेलंही खोट वाटावं अस जग , हे फसव जग नकोय , आई बाबाचे थकलेले डोळे , पिकलेले केस , ते धापा टाकण , ती शारीरिक दुखणी , सांधेदुखी ,जगायचय  तर फक्त त्यांची सेवा करायला . मी त्यांच्या सुखाकरता तिला प्रपोज केल , खूप मिस केल तिला कारण तिच्यावर निस्सीम विश्वास आहे , पण तिनी block  केल , मी ही राग आला हे खोटा आव आणत तिला block  केल पण वास्तवात माझ मरण मी च जाणतो , देव त्याना सुखी ठेवो ,  मी तुला समजतोय तुझ्याहून अधिक तुझ्या  मनातील चाललेल्या विचारांचा , चिंतांचा वेध घेतोय , मला निदान वाढदिवस नाही , दसरा नाही तर निदान दिवाळीला तर शुभेछा दे मेसेजनी . इगरली वेटिंग फॉर यूवर विशेस .

Saturday, 24 October 2015

मला फार आनंद वाटला की रोहण रविवारी स्वताः हुन भेटायला आला व आम्ही भेटलो , फार माहिती मिळते त्याच्या कडून व नातलग  असेच भेटत राहो असच कारण आपल  मन मोकळ करायला , गप्पा ऐकणार कोणी आहे हा एक फार मोठा आधार असतो . केतन सोबत बराच वेळ झाला फोनवर बोलण  नाही झाल माझा फोन खराब झाला तर , पण त्याचा फोन आला की बर होईल म्हणजे नव्या फोनमध्ये त्याचा नंबर सेव्ह करतो जो दुर्दैवाने डिलीट  झाला . प्रसादचे घरगुती भांडण मिटून वहिनी  परत आल्या व आता ते गुण्या गोविंदाने नांद्तायत हे खूप छान  झाले .  विशालच्या मिसेस ची डीलीव्हरी व्यवस्थित होऊन त्यांना  मुलगी झाली फार छान  झाल . देवा असच सर्व चांगल घडत राहुदे . मी सर्व मित्राना फार मिस करतो .
अशांसोबतच बोलायच ज्याना आपल्या भावनांची कदर असते , कोणाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला की लग्गेच देवाच नामस्मरण करायचं , जोइस मायर म्हणतात तस डोक्यात शैतानाचा शिरकाव होऊ द्यायचा नाही , कितीही कोणी मला पकाव म्हणो , टाळो  पण त्यांचा राग करायचा नाही , सर्वांसोबत चांगल वागायचं .  आई चा हात दुखत असेल तर व नसेल जरी खोबर खिसायच , कप बशी धुवायचे जस की नेहेमीच धुतो , शक्क्य तितक सर्वांच्या मदतीला धाउन जायचं . आनंद लुटायचा हरेक क्षण सर्वांसोबत आनंद वाटून . हे जग च मुळात एक स्वप्न आहे त्यातील मायावी तत्वाना बळी पडायचं नाही , हो हे मन फार हळवं  आहे त्यात कैक आठवणी भरल्यायत . बंडू मामा पावाला बटर लाउन दयायचे , जाम द्यायचे , मामींच्या हातच फोडणीच वरण , सुरेशामामा चे सांगितलेले गमतीशीर जोक्स, मामी कडच ते आंब्याच लोणच , ते पत्ते मेंढीकोट , challenge  खेळताना दीप्तीला गमतीत भैताड म्हणलेलं त्यावर सर्वांचा एकच हशा पिकण , बेबी मावशी कडच लिम्बाच काळसर लोणचं , त्या पिवळ्या , गुलाबी , निळसर तळलेल्या पेप्पी , डिस्को पापड्या , मालू मावशीनी केलेलं कौतुक , दुर्गा मावशीच रागवण , ते पोळ , घिके काका काकुंच गप्पा मारण , मी आणि केतन नी पूर्ण बाटली भर संपवलेला नागपूरच्या महाल वाड्यातील रसना , ते मामा आणायचे ते कावरे आईस्क्रीम , तो आक्काचा हितपर संदेश , छान  गोष्टी , सगळ सगळ न जाणे कालौघात कुठे हरपल , जीवन निरास वाटू लागल आता . जगावे तरी का ? इतक फ़्रस्ट्रेशन आलय ,  मी एकट  पडलो हे नक्की .मी तिच्याशी फ्लरटींग नाही केल, मी फ्लरटर नाहीये न मी मेनियाक आहे की मला पाहिजे ते मला मिळायलाच हव अस, मी माझ मन मोकळ बोललो हा  माझा गुन्हा का ? असो ; मला आता सवय करायला हवी सर्वांना टाळायची जे करण  माझच  मनोमरण असेल 

Tuesday, 22 September 2015

कोणी दुखात असेल तर आपण कधीच सुखात नाही राहू शकत किंबहुना समाधानी नाही राहू शकत त्यामुळे हे परमेश्वरा सर्वाना भौतिक सुख असो का नसो पण समाधानी बनव वा बनेलच अस मन दे, नाहीतर मन देउच नको  रोबोट , एलियन बनव .
कोणाच्या बोलण्याचे टोन , स्वर त्यावरून मन दुखतात . मिनिटा गणिक अशांतता पसरलीय जीवनात . एका क्षणाचा नेम नाही कोण कधी , किती  जगेल ? का तरी ह्या  द्वेष भावना तिरस्कार आहेत जगात कळत  नाही . मला स्वार्थी  जग नकोय , वाटत संपवावं हे आयुष्य , मरून जाव एकदाच अस उदास रहात जगण्यापेक्षा . मला धोका नव्हता द्यायचा तिनी , तिनी माझ्या पाठवलेल्या टेक्स्टचे स्क्रीन shots  घेऊन इमेल पाठवायचे नसते माझी बदनामी करत गावभर , मी विश्वासाने तिला बोललो तर माझ्या माघारी सांगत सुटली गाऱ्हाणे . बर झाल  नको तसला फालतू ग्रुप , आयुष्यात कोण्या ह्या अशा लबाडांना भेटायचं नाही . डोम्बल्याचा  खानदानी कट्टा म्हणे .

मी निगेटिव्ह थिंकर नाहीये पण मला जी काही वागणूक मिळाली , जे जीवनानी  दिल ते पाहून कोणीही पॉझीटीव्ह approach बाळगण शक्यच नाही ,  हो मूड स्विंग होतातच पण जिच्यावर मनापासून प्रेम करतो तिच्या सुखांकरता तिला टाळायच , तिला फॉरेन रिटर्न एन.  आर.  आय.  खूप मोठा pay  package salary वाला भेटो , तिला सगळ मनासारख मिळो . मी मागासलेल्या मराठवाड्यातील गावंढळ छाप तिला काय आवडणार तसाही ? मला न नॉलेज न manners . हो पण मी माझ आयुष्य अलिप्त राहण्यातच सगळयांच भल आहे , कोणात  मिक्स अप नाही व्हायचं , कोणाच्या मेसेज ला रिप्लाय नाही द्यायचे , शिष्ट असल्यागत आव आणून कमीत कमी बोलायच आणि टाळायच . लोक शिष्ठ , हेकेखोर म्हणतील मला तर म्हणू दे , तसंही  पकाव म्हणून तर माझी बदनामी केलीच आहे . हो मी मन मोकळ बोलतो  सगळ्याना आपल समजून तर मी पकावच झालो ना ,मला कोणाच कृत्रिम वागण नकोय , मला नात्यांत निर्भेळ , निखळ प्रेम अपेक्षित आहे कुठल्याही…  आणि ते काही मिळण शक्क्य नाही या जन्मी . पण देव वेस्टेज निर्माण करत नाही तस मी ही काही फालतू नाही पण मी हुशार देखील नाही , अहंकार नाही बाळगायचा आणि स्वताला अंडर इस्टीमेट पण नाही करायचं अस जगायचं . आई बाबां ना आनंद वाटेल अस वागायचं , जग गेल तेल आणायला . जस गणपती बाप्पा शिव पार्वतीला प्रदक्षिणा मारून त्यांनाच आपल सर्वस्व मानतो कार्तिकेय सोबत स्पर्धेत तस वागायचं . आपण आपल्या विरह  विश्वात रमायच पुस्तकांच्या सोबतीत. धार्मिक पुस्तक वेदाध्ययन करू पाहायचं , संस्कृत समजायचं, कोणासमोर कधी इम्प्रेशन म्हणून नव्हे तर फक्त स्वता:करता आपण आत्मा आहोत हे जाणून निस्वार्थी जीवन जगायचं.  मी वाईट आहे , फालतू आहे जे समजायचं ते समजू दे कोणाला . मी आता मुकाभिनय करणार . कोणाला कधी दूषण नाही देणार , मला किरकिर कटकट , कोणाचा अपमान करून बोलण  जमतच नाही पण जेंव्हा  कोणी कोणावर तस तोंडसुख घेत त्याना त्यांची लायकी दाखवायला उर्मट बोलून जातो कधी . माझ वागण नाटकी का वाटत पण मग ? मी तिची तिच्या आई बाबांची पण मनापासून खूप सेवा केली असतीच पण नाही ती नशिबात त्याला कोणाला दूषण देऊ? आपले विचार आपण त्याच व्यक्तीला मनमोकळे सांगतो न डगमगता ज्या व्यक्तीला आपण आपल जग , विश्व मानतो पण तिनी मला पकावच समजल आणि सगळीकडे सांगत सुटली , असो ; जाउदे मी च कमनशिबी मला वागायची अक्कल नाही . कशाला तिला नाव ठेउ ? सगळे चांगले आहेत मी वाईट असेल . ख्रिश्चन , मुस्लिम,हिंदू ,पारसी , शीख ,सर्व धर्मातील चांगल्या शिकवणीच  पालन करत मी कोणालाही कमी न लेखता चांगलच वागलो पाहिजे . मी व्हीम्जिकल नको वागायला म्हणूनच मला ती घाबरते वा पकाव समजते . हा blog  फक्त तिच्याकरता होता तो फक्त आता माझ्या मनासारखा एकटयाचाच राहिला . 

मला खूप असुरक्षित आणि नकोस झालय जीवन … कित्त्येक रेल्वे प्रवास असो , कुठून पायपीट करीत जात असो कोणी दारुडा नवरा त्याच्या बायका , मुलाना क्रूरपणे बडवतोय, घाण शिव्यांची लाखोली वाहतोय , किती पाप करते ती व्यक्ती आणि काय त्या बिचारया बायका मुलांची चूक असते , त्याचं जन्म घेणच त्यांच्या नशीबी असलेल्या नरकयातना का असतात ? का  कोणी कोण्या व्यक्तीला घालून पाडून अपमान करून , शिवीगाळ करून असुरी सुख मिळवते ? अस का असत की जिथे नवरा नम्र , सभ्य , मृदू , मनातील भावना जपणारा असतो नेमकी त्यालाच बहुदा क्रूर , बाहेरख्याली  भांडखोर कजाग बायको मिळते ? आणि जिथे नवरा क्रूर , अमानुष वागतात , लफडेबाज असतात , कुविचार मनात बाळगणारे असतात त्याना सुलक्षणी , गुणी , धाकात राहणारी बायको मिळते? हे असं का ह्या विवाहसंस्थेचे ड्रॉ backs असतात? का आपण अशाचा , अशीचाच अती विचार करून स्वप्न रंगवतो , त्याना खुश ठेवू पाहतो ज्याना आपल्या भावनांची कदरच नसते वा आपण त्यांच्या प्रायोरिटी लिस्ट मध्येच बिलकुलच नसतो ? आपण त्या व्यक्तीना इतके नकोसे होतो? का कोणी कोणामुळे बोअर  होऊन कोणाला टाळाव  वा त्याच्या भावना न समजून घेता त्याचा द्वेषच करत राहात ? कधी वाटत की सगळ डीझेल संपाव , पेट्रोल संपाव , मोबाइल टोंवर्स नासधूस व्हावेत व फोन संपर्क ही तुटावा , टी व्ही , इंटरनेट सगळ सगळ आधुनिक , कृत्रीम नष्ट व्हाव कि ज्यायोगे तरी दुरावलेली सर्व अहंपण , एकल्कोंडेपण  झुगारून एकत्र येतील , आनंदात हसत खेळत वावरतील… कित्त्येकदा मला वाटत की कोणी नको , कुठली कृत्रीम वस्तू नजरेस नको पडायला , कोणाचे संपर्क नकोत आणि अतीव अंधारात एकटच मंद वारयाच्या  झुळकेला अनुभवत शांत जागी एकांतात विचार करत बसावं जिथे काहीच नको न गाणे न कोणाचे बोलावणे न काही न काही , फक्त त्या सृष्टी निर्मात्याच्या शोध , वेध घ्यावा . वाटत की या जगात किती अस्थिरता , अशांतता आहे नको नको तो जन्म , नको ते सुखोपभोगही काही काहीच नको … डिस्कवरी वर जेव्हा पाहण्यात येत कि निरागस पाळीव लहानग्या जिवाला कोणी रानटी  पशु भक्ष बनवतो…. खूप रडू येत मनातून  ते पाहण्यात आल तर , की का ही अशी क्रूर रचना जीवो जीवस्य जिवनम  अशी ? का या जगात इतके क्रौर्य भरलेय ? कोणी कोणाशी निष्ठावान नाही , आजोबाजवळ नातही  सुरक्षित नाही , ना बापाजवळ मुलगी ? का कोणाच्या नियतीवर विश्वास ठेवावाच वाटू नये अशी  आज या कलियुगाची दुरवस्था ? मुली तरी काय बिभछ कपडे घालत देह प्रदर्शन करत फिरतात ? फेसबुक वर पर पुरुष , मित्राना अंग प्रदर्शन पर उत्तान कपडे घालून देह प्रदर्शन करवत लाइक्स मिळवत धन्यता मानतात? काय त्या लग्न झालेल्या बाया तरी काय मोठ्या गळ्यांचे ब्लाउज  , उघडी पाठ , बेंबी दिसेल अशी पोटाखाली साडी नेसून घाणेरड्या सारख्या प्लेझर , activa  वरून जाताना जराही लाजा बाळगत नाहीत?  यांच्या आया जर तश्या वागल्या असत्या तर याना काय वाटलं असत? आता इथून पुढे गलिछ  होत जाणार सगळ वातावरण , सगळ सगळ कलुषित झाल , बाटल हे जग , इंग्रजी शाळांनी त्यात भर घातली , कोणाला सणवार कंटाळा येतो , ही वाढलेली महागाई , कोणी कोणाला जड व्हावे इतके सगळे विचित्र मानसिकतेची पिढी आलीय , व्यवस्थित नीटनेटके सगळेच आउटडेटेड झाले आज … सर्वत्र अनियंत्रित , असंतुलीत घाण नकोस झालेल वातावरण कि ज्यांनी चेहऱ्याच  तेजच  गमावलं , आज हसणं  ही नाही फुटत खळाळून जोकवर इतक   असहनीय वातावरण झालय , वाटत प्रलय येउन सगळ सगळ नष्ट व्हाव , सगळेच त्रास न होता एकदम मरावेत , मी आधी की जेणेकरून कोणाचंच  कोणाला दुखच नको . जेन्व्हा कोणी खर प्रेम करत असेल कोणीवर तेंव्हा तो तिला त्याच्या  कल्पनाविश्वात जोक्स सांगून , मनातले भाव, विचार  शेअर करून , तिला अचानक भेटवस्तू देऊन तिच्या चेहेरया वरील आनंद पाहण्याची कल्पना करतो , ती व्यक्ती प्रपोज करते म्हणजे वाईट ठरत नसते . ती मनमोकळ बोलते पण गळ्यात पडत नाही त्या मुलीच्या की तू माझीच हो वगैरे … तिला ती व्यक्ती भोगविलासात पाहात नाही उपभोग्य शरीर म्हणून तर त्या व्यक्तीला त्या मुलीचा सहवास हवाहवासा आणि सुरक्षित असा वाटतो म्हणून . त्या व्यक्तींनी त्याची सहज इच्छा बोलणे हा गुन्हा नसतो की त्याला वाईट समजल जाव . अशाच हेकड , अर्काट मुली बरेचदा दुसऱ्याच्या  बोलण्या , दिसण्याला , आर्थिक सुबत्तेला पाहून स्वताः च्याच आयुष्याच मातर करून घेतात … खर प्रेम करणारयाला  खात्री असते की आपल्याहून जास्त खर प्रेम तिला कोणीच देऊ शकणार नाही , तिला जर दुसरया करवी त्रास झाला तर याला वाईट वाटत . त्याला वाटत की नसेना का ती त्याची सहचारिणी पण निदान ती जिथे असेल तिथे सुखात हसत खेळत नांदावी , तिला कजाग , जाहाम्बाज नवरा मिळून ती फसू नये , तिला सर्व ते मिळावे जे तिला हवे हवेसे वाटते. मी तर तिलाच प्रपोज केल की शप्पथ घेऊन की ती नाही तर कोणीच नाही आणि ती आहे की जिला माझ्याशी बोलण ही नकोस वाटत जणू काही मी त्रास देतोय ? काही वाईट बोलतोय? अरे मी तर शुभेच्छा देखील देऊ का अस विचारून दिल्या तर मी वाईट का ठरतो जेन्व्हा मी मनमोकळ करून बोलू का विचारून तिला जन्मोजन्मीच्या सोबत देण्याविषयी इच्छा व्यक्त करतो तर? मला तिच्या भूतकाळाशी काही देण घेण नसेल ती जशी आहे व होईल तशी चालेल मी तिला सुखात ठेवेल हा मला विश्वास आहे , काय वन नाईट stand मागीतला मी की आय लव्ह यु म्हणालो ? की अश्लील काही बोललो की काय अस वागलो की ज्याबद्दल मला पार वाळीतच टाकल्यागत झिडकारायच होत अस तिनी ? मला कधी प्रत्त्यक्षात  वा फोनवर तरी बोलून तिला मला जाणून घ्याव वाटू पण नये , अरे मला तर अजिबात लग्न च नव्हत करायचं पण केवळ तिला option म्हणून न पाहता ती नाही तर कोणीच नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करत प्रपोज केलेला . असो मला काही माझ मन खात नाही कारण माझी नियत वाईट नाही . आणि मलाही टाकण टाकलेल , उपकारात भिकेसारख मिळालेलं प्रेम? की सहानुभूती नकोच . मी आता एकटच राहणार . मी आई बाबा हे आणि हेच केवळ माझ जग … कोणी नको मला . मी न कधी नातलगांच्या गेट टूगेदर चा भाग बनणार न कधी कोणाला , कोणीला भेटणार , आय मी and  myself  अस बनणार  पण नाव न होऊ देता गुपचूप समाज हितपर कार्य करणार , ९ नोव्हेंबर ला जेंव्हा  तिला भेटलो रविवारी तिला काहीच खायला गेल नाही , सेफ खाल्ल  तिनी एक लहानस newzealand  च पिवळ्या रंगाच  तर तिला लगेच उलटी झाली . तिला काहीच सोसत नव्हत खाल्लेलं , विकनेस जाणवत होता  चेहराही मलूल निस्तेज झालेला तरी तिने आईला पोळ्या नाही लाटू दिल्या , तिनी स्वताच पोळ्या उभ्याने लाटून बनवल्या . वाटलं तिला सांगाव की लिव्हर फंक्शन s.g.p.t  test  करून घे gastro entrologist कडून , ते sparacid  लिक्वीड सायरप आणि domstal  गोळी देतील तर बर वाटेल पण न जाणे का अति विचारांत मला विसरच पडला सांगायचा 

बाबांच्या मित्रांनी झापल की अरे अमेय तुझ्या बाबाला मोबाइल वापरायला सांग , तू शिकव , सगळे प्रयोग झाले , मोबाईलही दिला , शिकवला पण त्यांनी काही महिन्यांपूर्वी तो कुठे पाडला आणि सिमकार्ड कुठे पाडलं ऑंफिसात की कुठे ते उचलूनच आणल नाही आणि हे मला इतक्या उशीरा कळतंय…तरी मलाच लोक झापतात , बाबाही बोलले माझा फोन का लागत नाही आणि लोकही उद्धट बोलतात - काय तुम्ही नंबर ही नाही , फोन नाही लागत , कसे वागता ? आता मी काय चुकलो यात त्यांनी सीम कार्ड हरवलं तर? माझी का चूक असते ह्यात ? त्याना सीम कार्डात सर्व मित्र नातेवाईक नंबर्स कॉपी करून दिले होते…पण मी आता वैतागलो मी नाही परत सीम कार्ड करता फॉर्म भरणार त्यांच्या न आता हा विचार करत त्रस्त होणार की कोणी त्या सीम कार्ड चा मिस युज तर नाही करायचं ? मी कितीही चांगल वागा मलाच झाप खावी लागते बाबांची किंवा कधी त्यांच्या मित्रांची