मला खूप असुरक्षित आणि नकोस झालय जीवन … कित्त्येक रेल्वे प्रवास असो , कुठून पायपीट करीत जात असो कोणी दारुडा नवरा त्याच्या बायका , मुलाना क्रूरपणे बडवतोय, घाण शिव्यांची लाखोली वाहतोय , किती पाप करते ती व्यक्ती आणि काय त्या बिचारया बायका मुलांची चूक असते , त्याचं जन्म घेणच त्यांच्या नशीबी असलेल्या नरकयातना का असतात ? का कोणी कोण्या व्यक्तीला घालून पाडून अपमान करून , शिवीगाळ करून असुरी सुख मिळवते ? अस का असत की जिथे नवरा नम्र , सभ्य , मृदू , मनातील भावना जपणारा असतो नेमकी त्यालाच बहुदा क्रूर , बाहेरख्याली भांडखोर कजाग बायको मिळते ? आणि जिथे नवरा क्रूर , अमानुष वागतात , लफडेबाज असतात , कुविचार मनात बाळगणारे असतात त्याना सुलक्षणी , गुणी , धाकात राहणारी बायको मिळते? हे असं का ह्या विवाहसंस्थेचे ड्रॉ backs असतात? का आपण अशाचा , अशीचाच अती विचार करून स्वप्न रंगवतो , त्याना खुश ठेवू पाहतो ज्याना आपल्या भावनांची कदरच नसते वा आपण त्यांच्या प्रायोरिटी लिस्ट मध्येच बिलकुलच नसतो ? आपण त्या व्यक्तीना इतके नकोसे होतो? का कोणी कोणामुळे बोअर होऊन कोणाला टाळाव वा त्याच्या भावना न समजून घेता त्याचा द्वेषच करत राहात ? कधी वाटत की सगळ डीझेल संपाव , पेट्रोल संपाव , मोबाइल टोंवर्स नासधूस व्हावेत व फोन संपर्क ही तुटावा , टी व्ही , इंटरनेट सगळ सगळ आधुनिक , कृत्रीम नष्ट व्हाव कि ज्यायोगे तरी दुरावलेली सर्व अहंपण , एकल्कोंडेपण झुगारून एकत्र येतील , आनंदात हसत खेळत वावरतील… कित्त्येकदा मला वाटत की कोणी नको , कुठली कृत्रीम वस्तू नजरेस नको पडायला , कोणाचे संपर्क नकोत आणि अतीव अंधारात एकटच मंद वारयाच्या झुळकेला अनुभवत शांत जागी एकांतात विचार करत बसावं जिथे काहीच नको न गाणे न कोणाचे बोलावणे न काही न काही , फक्त त्या सृष्टी निर्मात्याच्या शोध , वेध घ्यावा . वाटत की या जगात किती अस्थिरता , अशांतता आहे नको नको तो जन्म , नको ते सुखोपभोगही काही काहीच नको … डिस्कवरी वर जेव्हा पाहण्यात येत कि निरागस पाळीव लहानग्या जिवाला कोणी रानटी पशु भक्ष बनवतो…. खूप रडू येत मनातून ते पाहण्यात आल तर , की का ही अशी क्रूर रचना जीवो जीवस्य जिवनम अशी ? का या जगात इतके क्रौर्य भरलेय ? कोणी कोणाशी निष्ठावान नाही , आजोबाजवळ नातही सुरक्षित नाही , ना बापाजवळ मुलगी ? का कोणाच्या नियतीवर विश्वास ठेवावाच वाटू नये अशी आज या कलियुगाची दुरवस्था ? मुली तरी काय बिभछ कपडे घालत देह प्रदर्शन करत फिरतात ? फेसबुक वर पर पुरुष , मित्राना अंग प्रदर्शन पर उत्तान कपडे घालून देह प्रदर्शन करवत लाइक्स मिळवत धन्यता मानतात? काय त्या लग्न झालेल्या बाया तरी काय मोठ्या गळ्यांचे ब्लाउज , उघडी पाठ , बेंबी दिसेल अशी पोटाखाली साडी नेसून घाणेरड्या सारख्या प्लेझर , activa वरून जाताना जराही लाजा बाळगत नाहीत? यांच्या आया जर तश्या वागल्या असत्या तर याना काय वाटलं असत? आता इथून पुढे गलिछ होत जाणार सगळ वातावरण , सगळ सगळ कलुषित झाल , बाटल हे जग , इंग्रजी शाळांनी त्यात भर घातली , कोणाला सणवार कंटाळा येतो , ही वाढलेली महागाई , कोणी कोणाला जड व्हावे इतके सगळे विचित्र मानसिकतेची पिढी आलीय , व्यवस्थित नीटनेटके सगळेच आउटडेटेड झाले आज … सर्वत्र अनियंत्रित , असंतुलीत घाण नकोस झालेल वातावरण कि ज्यांनी चेहऱ्याच तेजच गमावलं , आज हसणं ही नाही फुटत खळाळून जोकवर इतक असहनीय वातावरण झालय , वाटत प्रलय येउन सगळ सगळ नष्ट व्हाव , सगळेच त्रास न होता एकदम मरावेत , मी आधी की जेणेकरून कोणाचंच कोणाला दुखच नको . जेन्व्हा कोणी खर प्रेम करत असेल कोणीवर तेंव्हा तो तिला त्याच्या कल्पनाविश्वात जोक्स सांगून , मनातले भाव, विचार शेअर करून , तिला अचानक भेटवस्तू देऊन तिच्या चेहेरया वरील आनंद पाहण्याची कल्पना करतो , ती व्यक्ती प्रपोज करते म्हणजे वाईट ठरत नसते . ती मनमोकळ बोलते पण गळ्यात पडत नाही त्या मुलीच्या की तू माझीच हो वगैरे … तिला ती व्यक्ती भोगविलासात पाहात नाही उपभोग्य शरीर म्हणून तर त्या व्यक्तीला त्या मुलीचा सहवास हवाहवासा आणि सुरक्षित असा वाटतो म्हणून . त्या व्यक्तींनी त्याची सहज इच्छा बोलणे हा गुन्हा नसतो की त्याला वाईट समजल जाव . अशाच हेकड , अर्काट मुली बरेचदा दुसऱ्याच्या बोलण्या , दिसण्याला , आर्थिक सुबत्तेला पाहून स्वताः च्याच आयुष्याच मातर करून घेतात … खर प्रेम करणारयाला खात्री असते की आपल्याहून जास्त खर प्रेम तिला कोणीच देऊ शकणार नाही , तिला जर दुसरया करवी त्रास झाला तर याला वाईट वाटत . त्याला वाटत की नसेना का ती त्याची सहचारिणी पण निदान ती जिथे असेल तिथे सुखात हसत खेळत नांदावी , तिला कजाग , जाहाम्बाज नवरा मिळून ती फसू नये , तिला सर्व ते मिळावे जे तिला हवे हवेसे वाटते. मी तर तिलाच प्रपोज केल की शप्पथ घेऊन की ती नाही तर कोणीच नाही आणि ती आहे की जिला माझ्याशी बोलण ही नकोस वाटत जणू काही मी त्रास देतोय ? काही वाईट बोलतोय? अरे मी तर शुभेच्छा देखील देऊ का अस विचारून दिल्या तर मी वाईट का ठरतो जेन्व्हा मी मनमोकळ करून बोलू का विचारून तिला जन्मोजन्मीच्या सोबत देण्याविषयी इच्छा व्यक्त करतो तर? मला तिच्या भूतकाळाशी काही देण घेण नसेल ती जशी आहे व होईल तशी चालेल मी तिला सुखात ठेवेल हा मला विश्वास आहे , काय वन नाईट stand मागीतला मी की आय लव्ह यु म्हणालो ? की अश्लील काही बोललो की काय अस वागलो की ज्याबद्दल मला पार वाळीतच टाकल्यागत झिडकारायच होत अस तिनी ? मला कधी प्रत्त्यक्षात वा फोनवर तरी बोलून तिला मला जाणून घ्याव वाटू पण नये , अरे मला तर अजिबात लग्न च नव्हत करायचं पण केवळ तिला option म्हणून न पाहता ती नाही तर कोणीच नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करत प्रपोज केलेला . असो मला काही माझ मन खात नाही कारण माझी नियत वाईट नाही . आणि मलाही टाकण टाकलेल , उपकारात भिकेसारख मिळालेलं प्रेम? की सहानुभूती नकोच . मी आता एकटच राहणार . मी आई बाबा हे आणि हेच केवळ माझ जग … कोणी नको मला . मी न कधी नातलगांच्या गेट टूगेदर चा भाग बनणार न कधी कोणाला , कोणीला भेटणार , आय मी and myself अस बनणार पण नाव न होऊ देता गुपचूप समाज हितपर कार्य करणार , ९ नोव्हेंबर ला जेंव्हा तिला भेटलो रविवारी तिला काहीच खायला गेल नाही , सेफ खाल्ल तिनी एक लहानस newzealand च पिवळ्या रंगाच तर तिला लगेच उलटी झाली . तिला काहीच सोसत नव्हत खाल्लेलं , विकनेस जाणवत होता चेहराही मलूल निस्तेज झालेला तरी तिने आईला पोळ्या नाही लाटू दिल्या , तिनी स्वताच पोळ्या उभ्याने लाटून बनवल्या . वाटलं तिला सांगाव की लिव्हर फंक्शन s.g.p.t test करून घे gastro entrologist कडून , ते sparacid लिक्वीड सायरप आणि domstal गोळी देतील तर बर वाटेल पण न जाणे का अति विचारांत मला विसरच पडला सांगायचा

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home