Tuesday, 22 September 2015

बाबांच्या मित्रांनी झापल की अरे अमेय तुझ्या बाबाला मोबाइल वापरायला सांग , तू शिकव , सगळे प्रयोग झाले , मोबाईलही दिला , शिकवला पण त्यांनी काही महिन्यांपूर्वी तो कुठे पाडला आणि सिमकार्ड कुठे पाडलं ऑंफिसात की कुठे ते उचलूनच आणल नाही आणि हे मला इतक्या उशीरा कळतंय…तरी मलाच लोक झापतात , बाबाही बोलले माझा फोन का लागत नाही आणि लोकही उद्धट बोलतात - काय तुम्ही नंबर ही नाही , फोन नाही लागत , कसे वागता ? आता मी काय चुकलो यात त्यांनी सीम कार्ड हरवलं तर? माझी का चूक असते ह्यात ? त्याना सीम कार्डात सर्व मित्र नातेवाईक नंबर्स कॉपी करून दिले होते…पण मी आता वैतागलो मी नाही परत सीम कार्ड करता फॉर्म भरणार त्यांच्या न आता हा विचार करत त्रस्त होणार की कोणी त्या सीम कार्ड चा मिस युज तर नाही करायचं ? मी कितीही चांगल वागा मलाच झाप खावी लागते बाबांची किंवा कधी त्यांच्या मित्रांची

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home