मी निगेटिव्ह थिंकर नाहीये पण मला जी काही वागणूक मिळाली , जे जीवनानी दिल ते पाहून कोणीही पॉझीटीव्ह approach बाळगण शक्यच नाही , हो मूड स्विंग होतातच पण जिच्यावर मनापासून प्रेम करतो तिच्या सुखांकरता तिला टाळायच , तिला फॉरेन रिटर्न एन. आर. आय. खूप मोठा pay package salary वाला भेटो , तिला सगळ मनासारख मिळो . मी मागासलेल्या मराठवाड्यातील गावंढळ छाप तिला काय आवडणार तसाही ? मला न नॉलेज न manners . हो पण मी माझ आयुष्य अलिप्त राहण्यातच सगळयांच भल आहे , कोणात मिक्स अप नाही व्हायचं , कोणाच्या मेसेज ला रिप्लाय नाही द्यायचे , शिष्ट असल्यागत आव आणून कमीत कमी बोलायच आणि टाळायच . लोक शिष्ठ , हेकेखोर म्हणतील मला तर म्हणू दे , तसंही पकाव म्हणून तर माझी बदनामी केलीच आहे . हो मी मन मोकळ बोलतो सगळ्याना आपल समजून तर मी पकावच झालो ना ,मला कोणाच कृत्रिम वागण नकोय , मला नात्यांत निर्भेळ , निखळ प्रेम अपेक्षित आहे कुठल्याही… आणि ते काही मिळण शक्क्य नाही या जन्मी . पण देव वेस्टेज निर्माण करत नाही तस मी ही काही फालतू नाही पण मी हुशार देखील नाही , अहंकार नाही बाळगायचा आणि स्वताला अंडर इस्टीमेट पण नाही करायचं अस जगायचं . आई बाबां ना आनंद वाटेल अस वागायचं , जग गेल तेल आणायला . जस गणपती बाप्पा शिव पार्वतीला प्रदक्षिणा मारून त्यांनाच आपल सर्वस्व मानतो कार्तिकेय सोबत स्पर्धेत तस वागायचं . आपण आपल्या विरह विश्वात रमायच पुस्तकांच्या सोबतीत. धार्मिक पुस्तक वेदाध्ययन करू पाहायचं , संस्कृत समजायचं, कोणासमोर कधी इम्प्रेशन म्हणून नव्हे तर फक्त स्वता:करता आपण आत्मा आहोत हे जाणून निस्वार्थी जीवन जगायचं. मी वाईट आहे , फालतू आहे जे समजायचं ते समजू दे कोणाला . मी आता मुकाभिनय करणार . कोणाला कधी दूषण नाही देणार , मला किरकिर कटकट , कोणाचा अपमान करून बोलण जमतच नाही पण जेंव्हा कोणी कोणावर तस तोंडसुख घेत त्याना त्यांची लायकी दाखवायला उर्मट बोलून जातो कधी . माझ वागण नाटकी का वाटत पण मग ? मी तिची तिच्या आई बाबांची पण मनापासून खूप सेवा केली असतीच पण नाही ती नशिबात त्याला कोणाला दूषण देऊ? आपले विचार आपण त्याच व्यक्तीला मनमोकळे सांगतो न डगमगता ज्या व्यक्तीला आपण आपल जग , विश्व मानतो पण तिनी मला पकावच समजल आणि सगळीकडे सांगत सुटली , असो ; जाउदे मी च कमनशिबी मला वागायची अक्कल नाही . कशाला तिला नाव ठेउ ? सगळे चांगले आहेत मी वाईट असेल . ख्रिश्चन , मुस्लिम,हिंदू ,पारसी , शीख ,सर्व धर्मातील चांगल्या शिकवणीच पालन करत मी कोणालाही कमी न लेखता चांगलच वागलो पाहिजे . मी व्हीम्जिकल नको वागायला म्हणूनच मला ती घाबरते वा पकाव समजते . हा blog फक्त तिच्याकरता होता तो फक्त आता माझ्या मनासारखा एकटयाचाच राहिला .

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home