Friday, 12 December 2014

मी आईला कधी  लाडानी गोलू म्हणतो , ती जी काळजी करते त्यामुळे असेच पाणी येते कधी डोळ्यांत , तिच्यावर बाबा चिडले , रागावले की मलाच मेल्याहून मेल्यासारख होत , भावना नको ना दुखवायला पाहीजे , नको ते पाषाण हृदय जे दुखः देईल , नको ती गार्हाणी , नको ते वाभाडे काढलेले , नको ते चिडके बोल, नको तो संताप , नको घरात वाद . असावेत तर निव्वळ प्रेमळ भावनेचा काळजीपोटी वाहिलेला गमतीतलाच भावना न दुखावता केलेला संताप , 
मी आईला कंटाळा वाटू नये म्हणून कोको नावाचे मोठे शब्दकोडे देतो , रमते ती बिचारी. 

बाबा कधी त्यांच्या केसांची बारीक cutting करवून आले की आपसूकच गमतीने हसतो मी गालातल्या गालात , कारण छोटे बाळाचेच वाटते ते त्यांचे डोके , आणि ते पेपर वाचत असले  की त्यांच्या मानेवरील फुगीर गादीवर गमतीत बोट फिरवून गम्मत करतो मी , ते गमतीत रागाने पाहतात , मला खूप हसायला येत .

मला आयुष्यात हे हसरे क्षण गमवायचे नाहीत ,

आईच युटरसच operation झाल १९९३ ला सांगली ला तर मी रडलो पण चेहरा लपवत रडलो , तिला सलायन लावलेलं पाहील तर , दिसलो कोणाला रडताना मी तर सांगितलं त्याना की डोळ्यात काहीतरी धूळ गेली ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home