रोजच्या भांडण आणि कटकटीचा कंटाळा आला आता , वाटत संपवावं आयुष्य , अस नाही की आपण फार दुखात आहोत, जगात आपल्याहून कित्त्येक दुखी लोक आहेत. पण व्यक्ती आपल्या घराबाहेरील जगाशी लढू शकते निर्धाराने अन खंबीरपणे पण जेव्हा त्याच सर्वस्व त्याच कुटूंब त्यातच जर शुल्लक कारण वा अकारणही रोज वाद विवाद, भांडण , किरकिरी, ते जिव्हारी लागेल असे बोलणे , एकमेकांच्या खानदानाचा उद्धार करेपर्यंत अगदी जीव नकोसा करवणारी भांडण रोजच होऊ लागली तर हे जीवनच नको नको होऊन जात , मी तिला एक मनमोकळा गप्पांचा आधार समजलो साता जन्माकरता पण ती न जाणो मला का इतक वाईट समजली की माझ्याशी साध बोलण तर दूरच राहील पार वाळीतच टाकल तिनी मला , क्षणो न क्षण मरणासन्न अवस्था झालीय मनाची की असा काय गुन्हा केला मी मनमोकळ बोललो काय तर ? तिनी अबोला काय धरला हे जगच परक वाटू लागल . ती सोडून जगात कोणीवर विश्वास नव्हता आणि नसेल म्हणून तिला मिस करू लागलो आणि कदाचित माझ्या मेल्यानंतरही करतच राहील कारण आत्मा भटकतच राहील माझा . मी हा शब्द मला नकोय , हे जग अतीव दुखानी भरलय , खूप कलहानी भरलय , कुठेही शांतता , स्तब्धता नाही . यंनीच्या जुनून अल्बमसारख चैन ईक पल नही , चैन ईक पल नही , और कोई हल नही, say your need गाण्यागत मनाची अवस्था झालीय . तिच्या व्रुश्चिक राशीला आणि आईच्या तूळ राशीला साडेसाती आहे तर शनिवारी शनीच्या मंदिरात शनी महाराजाना म्हणालो की त्यांची साडेसातीचे त्रास माझ्या वाटयाला दे आणि त्याना सुख दे . हरेकाला वाटत की आपणच बरोबर असतो पण कधी आपण त्यांच्या जागी स्वता:ला ठेऊन पाहावं अशी माझी मानसिकता असत आलीय , तिला तस का वाटत नसेल बर ? कदाचित मला ती वाईट समजतही नसेल , मी माझ्याच कल्पनेत रंग भरतो स्वता:च आणि तसा विचार करतो . कधी आयुष्यात अशी वेळ येते की गाणे ऐकण नको वाटत , कोणी मित्र नको , कुठे बाहेर जाणे नको . की कोणाची संगत नको , शांत अंधारात गप्प बसून शुन्य नजरेत जगाचा वेध घ्यावा , बाबांच्या नोकरीमुळे , बदलीमुळे कोणाची कायम अशी भक्कम साथ , आधार , ओळखीच नसायच्या , स्वताः ला सतत काही न काही कामांत व्यस्त करवूनही मनाला शांतता अशी मिळतच नाहीये , सतत मन सैरभैर होत कशाच्या तरी शाश्वत शांततेचा शोध घेताय घेतंय . वाईट कोणी नाही मी सोडून , सगळे चांगले , तिनीच मला वाटत रोहन , केतनला सांगितलं असेल की अमेय एकटा पडलाय प्लीज त्याला आधार दे , बोला त्यासोबत , ती एक पवित्र आत्मा आहे दैवी एंजल जी मनात कुढत असेल , एकांतात रडत असेल, या जगात किती अस्थिरता आहे , बेरोजगारी , शेतकऱ्याच्या आत्महत्त्या , गरीबी , घरोघर किरकिरी , शारीरिक दुखणी , सतत अशांतता , युध्द , काही लोक जे ज्ञानी आहेत कशा बाबतीत ती माहिती देताना खोचक बोलतायत , अपमान करून असुरी आनंद मिळवतात . अश्लीलता, सर्वत्र जीव गुदमरवेल अस भयावह वातावरण . कोणी कोणाकडे न जाणे येणे , न कोणावर विश्वास ठेवावा अशी मनाची अवस्था , घालमेल . एक अनाहूत भीती समाजाची . या जगात सुख हे नाहीच , आपणच कल्पना विश्वात रमतो याकरता कशात बिझी करवून घ्याव तर त्यातही दुख , काही positive वाचलेलंही खोट वाटावं अस जग , हे फसव जग नकोय , आई बाबाचे थकलेले डोळे , पिकलेले केस , ते धापा टाकण , ती शारीरिक दुखणी , सांधेदुखी ,जगायचय तर फक्त त्यांची सेवा करायला . मी त्यांच्या सुखाकरता तिला प्रपोज केल , खूप मिस केल तिला कारण तिच्यावर निस्सीम विश्वास आहे , पण तिनी block केल , मी ही राग आला हे खोटा आव आणत तिला block केल पण वास्तवात माझ मरण मी च जाणतो , देव त्याना सुखी ठेवो , मी तुला समजतोय तुझ्याहून अधिक तुझ्या मनातील चाललेल्या विचारांचा , चिंतांचा वेध घेतोय , मला निदान वाढदिवस नाही , दसरा नाही तर निदान दिवाळीला तर शुभेछा दे मेसेजनी . इगरली वेटिंग फॉर यूवर विशेस .