Thursday, 25 December 2014

३३ कोटी देवांची शप्पथ _______________________________________

माझ जीवन खूप अशांत मी च करतो खर अती विचार करून पण विचार मी करतच नाही ते तर आपसूकच सुचतात ना

तू कशीही वाग , ब्लॉक कर अकाउंट पण मी नाही तुझा राग करू शकत , मी प्रेम केलय मनोमन तुझ्या भावनांवर तर मी त्या दुखवायला नकोयत ह्याची मला जाणीव असलीच पाहिजे
तू वय , अनुभव , सर्वानीच हुशार मी कस काय मुर्खासारख वागतो ना ?
पण हे मन मोठ गुंतागुंतीच जाळ असत

एखादी व्यक्ती जे मनात असेल ते बोलते , भय न बाळगता आणि नम्रतेने तर ती वाईट का ठरते ?

एखाद्याच्या मनाशी का आपण एवढे एकरूप  होतो जिला आपल्या भावनांची जराही कदर नसते ?

हे जीवन सतत अशी दु:ख देतय  सावरण शक्क्यच नाही तरी का जीवन जगतोय कळतच नाही 

 माझ माझ अस करण्यात का मी आयुष्य जगावं ? पण इतराना आपल मानावं तर ते का अचानक बदलतात 

मी काय ठरवलंय कुठे जाणार काय करणार हे  जर त्या नियतीने आधीच ठरवलंय तर मी कसला विचार करून दुखी होतोय 

काय याच जिवनाच  अंतिम फलित साधणार आहे 

सगळे बदलत गेले परिस्थितीनुसार मी ठाम राहिलो तर मला असमाधान का वाटावं जर माझी तत्व ही देवाच्या नजरेत आदर्श आहेत

अरे यार मी अस नाही  वागायला पाहिजे , तुलाही  मत आहेतच , तुझ्या भावनांची मी कदर करायलाच पाहिजे , मी वाईट नाही पण मी हे बिंबवू इच्छित नाही कारण मला आजतागायत माझ्या वागणूकीवरून  ओळ्खल का ? माझा स्वभाव मलाच कळत नाही कसाय तर . 
मला खूप कष्ट करून मोठ व्हायचंय पण हा जॉब  वाईट मार्गाचा असेल तर नको मला मी रिजाइन करणार एक  तारखेला , मला नशीब कुठेही  नेवो पण मी प्रयत्न सोडणार नाही , इंशुरन्स मध्ये तसाही मला इंटरेस्ट नाही , मी धडपड  करून , खटपट करून नक्की यश मिळवणारच

Tuesday, 16 December 2014


मी काय तोंडानी तुझी माफी मागणार होतो ? म्हणून मी बोटांनीच sorry पाठवतो पण मनापासून , स्वाभाविक आहे तुला तसा अद्भूत धक्का अचानक बसण , कारण कधी अस अपेक्षितच नसत न ,  माझ्या अति संवेदनशील स्वभावामुळे मला मी कोणाला गमावायाचो तर नाही नात्यांना दुरावे आल्यामुळे अंतरांचे अशा अनामिक भीतीत जगायचो . आणि जगात आलोय , मी मित्र , शाळेचे मित्र , COLLEGE FRIENDS , JAPANESE  TUTION  FRIENDS , OFFICE FRIENDS , COURT  FRIENDS  , OTHERS आणि या सर्वांहून जे आपले असतात ते आपले नातलग गमावेल तर नाही दूर राहतोय तर अशा भीतीत रहायचो , गर्दीत असूनही मी एकट  असायच मनानी कारण न पटणारे , न रुचणारे अशा विचारांचे काही लोक असायचे , कोणावर विश्वास नाही एकटेपणा खायचा , मी भावूक होऊन काय करून बसलो मला आता काहीच कळेना , अभ्यास , झोप नाही , सतत अती विचार , सर्वाची अति काळजी मला अस वेड  करील वाटलं नाही , मी वाहावत गेलो त्या चक्रात अन अस भयानक करून ठेवाल की आता ढसाढसा रडूनही उपयोग नाही कारण  तुझा विश्वास गमावला , मी खरच चाललोय मन:शांतीकरता इगतपुरी वा असायलम मध्ये , जिथे मन:शांती मिळवेल , OFFICE  ला गेलो नाहीये काल , सर्व ठप्प झाले व्यवहार ,
माझी घोडचूक झाल्याने माफी ही मागण्या लायक राहिलो नाही , मी तुला माफ कर नाही म्हणत कारण मीच तुला का BLOCK  केल कारण की माझ्यातर्फे कोणाला परत काही वेडवाकड नको पाठवलं जायला , मी मनाची शांतता गमावून बसलोय , 
तुला पटत नसेल तर माझ्या डोक्याचे CT  SCANS  केलेले फोटोही पाठवले असते पण, आता तुझा विश्वास गमावला , मी देवाला रोज हात जोडतो की तुझ्या मनात आता जागा मला राहिलीच नाही पण तुझा रोष नको ओढवून घ्यायचा होता मी , मी पागल नाही पण मनोरूग्ण च बनलो जणू , आता NORMALCY  ला आलोय तर परत नाही तुझ्याशी बोलत कारण मला खूप भीती वाटते तू आता खूप भांडशील मला आणि मी परत वेड  होईल ठाम जस ३-४ दिवसांपूर्वी वागून गेलो . बाय, मी BLOG  DELETE  करतोय माझा , जो अनावधानाने बनला गेला माझ्या वेडात , अन संवेदनशील भीतीपोटी , आता मी नॉर्मल झालोय म्हणून मी येतच नाही परत , चाल बाय स्वाती ताई

Monday, 15 December 2014

हे भगवान तूने  क्यों ये आज का दिन दिखलाया  जो दिन नहीं रात है ,  अंधेरोंकी बरसात हैं , जिनेकी  ना  आस है , और मौत की ना बात हैं , जान लेता तू मेरी तो एहसान मानता और पैदा ही ना करता जो 
मुझे तो तेरे कदमोंको जिंदगीभर चूमता , दरअसल मैंने उसमे  रब देखा हैं पर उसनेही मुँह फेर दिया , मुझे भलेही पेहेले कहां सुकून था की कितने दुखी लोग हैं इस दुनिया में , मैंने उनके दर्द को महसूस किया  जिसके सामने मेरा कुछ बाकी दिलोंका दर्द  कुछ भी मायने न रखता था , दरअसल मैं दुखियोंका  दर्द मिटाता तो जी पाता सुकून से , पर तूने इक फरिश्तोंसी परी  मेरे ख़्वाबों - खयालों में ही नहीं पर दिलो - दीमाग पर विराजित कर दी  जिसकी हर  बात मेरी  अंतरात्मा की पुकार हो गयी और हमेशा बरकरार रहेगी , ये उम्रकी गलती  न थी ना मेरी उलझनों भरी सोच पर थी वो ऐसी घड़ी जिससे  रहा था हररोज , अब मेरी हालत तो उस वीरान जगहसी हो गयी जहा कभी बारिश की बुँदे ही ना गिरेगी , मेरी सोच गलत ना थी ना उसकी कोई गलती , वो तो अपने दर्द दिलमे रखकर मुझे खुश देखना चाहती है पर, वो   ये नहीं जानती की  उसके दिलके दर्द महसूस  ही नहीं दर्द देते हैं मुझे , वो तो पाक दिलकी वो ग़ज़ल हैं जिसे भगवान तेरी दरबारमे सिंघासन  पर स्थान हैं , मैं उससे दूर गया तो उससे नहीं रूठा हूँ  बल्कि उसे खुश देखने  के लिए उससे दूर जा रहा हूँ जो मेरी आत्मा के  मौत के तरफ बढ़ाया कदम हैं ,
केहेते हैं वक़्त सब बीमारियों का इलाज हैं पर जब मेरा वक़्त ही थम  चुका हैं तो मैं क्योँ झूँठी खुशीयोंकी तरफ जिंदगीके इस अंगार भरे पथ पर चलता जाऊ? वक्त आगे बढ़ेगा पर मेरा दिल दिनभरदिन तड़प तड़प मरेगा , ना  मौत आएगी मुझको ना मैं जी पाउँगा , हे खुदा तूने मुझसे दूरियां करली  और मैंने भी तेरी खुशीयोंकी खातिर इन काँटोंभरी राहोंको अपना लिया , स्वाती मेरे खुदा   तू  ना भी अगर मिलता कहीं तेरी  यादोंमें ये दिल कोने में कही पड़ा रहता पर आज जो  हो गया जो तेरी नजरोंसे हमेशा के लिए ना गिरता , तू इन अल्फाजोंको मत देख , मैं मेरा दर्द खुदसे ही बाटता पर मैं मेरा भी ना रहा , अगले जनम तेरी पनाहोंमे जिंदगी दे ना दे पर अपनी निगाहोंसे रुसवा न कर लेना कही मैं इस कदर न मर जाऊ की ये अल्फाज भी ना बयां कर पाउ ,  ये मेरा दीवानापन कुछ काम आये और मैं पागल ही सही तेरा वो कहनेका खिताब पाउ तो उसीके सहारें कुछ पल काट जायेँ ,  वो शायरी जो मैं लिखता था दिल मेरा जलाकर और तेरी हँसी पाकर उस मेरे जलते दिलोंकी आग पर मरहम लगाया करता था और  ये सिलसिला मेरी अरमानोंके जनाजे के तरफ मेरा कदम था जो आज उस दवा को तलक तरस गया , दर्द तो हो रहा हैं , इलाज को भी मैं रोक रहा हूँ , जी भी नहीं पा रहा हूँ और मौत भी ना आ रही हैं , 
मेरे खुदा तू जिस दुनिया में जिए खुश रहे , तेरा हँसना हमें ना सुनाई देगा ना दिखाई पर दिलको महसूस हो इसकी शिनाख्त बस हो जाएँ , तुझसे जाकर दूर जी भी ना पाउँगा बस एक शरीर होगा आत्मा बाहर भटक रही होगी , शरीर चलेगा पर दिमागके थोड़ेसे सहारेसे पर तेरे दिलमे जगा मिलती अगर मेरे इस नादाँ  दिल को तो यह थोड़ा संभल जाता , तुझे कसम हैं मेरी  मेरे इन आँसूभरे दिल के अल्फ़ाजोंको न पढ़ कही तेरे मुझसे ज्यादा कोई खुश रखनेवाले की और बढ़ते तेरे कदमोंको  जानेसे तेरे कदम ना लड़खडादे , पर काश कमसे कम मुझे वो जरिया बनादे जो तुझे लडख़ड़ानेसे रोकले , 
बिन तेरे बिन तेरे बिन तेरे कोई खलिश हैं खयालों में बिन तेरे तूने मुझसे २० अगस्त को सुन तो लिया पर उसमे मेरे दर्द की गूंज ना सुनाई दी 
, तुझे मैं तड़पता न देखू मेरी यादोंमे इसलिए मैं खुद तेरी नजरोंमे गिर गया या ऐसा उस परवरदिगार ने मुझसे कर लिया काश इसका जवाब मेरी मौत भी न दे सके , हमने पूना जाते वक्त साथ सूना फटे इश्तेहार (poster ) निकला हीरो का वो गाना - मैं रंग शरबतोंका तू मीठे घाट का पानी , और इस शरबत को बेरंग कर गया मेरी  खुद की वजहसे और मई खड़ा घाट पर फिरभी ऐसा बंधा जो तेरी बातोंकी प्यास पाने तरस गया ,  और उस रोज पेहेले जो हम सब्जी खरीदने गए तो तेरा सब्जीवालेसे कहा वो लफ्ज - धनिया कैसा दिया भैया ? काश आज वो मुझसे तू कहे की -मैंने दी जो तुझे यादें उनका क्या मोल हैं  ? तो मैं केहे दू की वो तो अनमोल हैं

Sunday, 14 December 2014

स्वातीमामेताई ,

मला तुझा अजिबात राग आला नाहीये , मला तू जस वागशील तस स्वीकार आहे , फक्त मला वाईट एका गोष्टीच वाटलं की  मला इतक कफल्लक नव्हत ग समजायचस , कि कशाची  प्रतिक्रिया न देता सरळसोट block केलस , मला अजिबात संसार थाटायच मन नव्हत न कधी आता असेल , या आईनी   परेशान केलेलं 
मला की लग्न कर , इत्यादी पण मी कधीच शपथ घेतलेली की ते करायचच नाही ,ती शपथ केवळ तुझ्याकरता मोडली , माझ मन हे फक्त आठवणीवर जगवल, मी लोफर , टुकार नाहीये मी तर गृप ३ वेळा सोडला त्यात तू २ वेळा विचारणा केली म्हणून आलो , मला अजूनही वाटत की तू माझ्या चांगल्यासाठी मला नाकारलस ,तू  भाउच  मानत आलीस आणि मानत होती, आहेस हे सांगितलस , पण मी अशा वेळी ते वाचल आणि तू पाठवलं की माझ्या मनाला तो एक अनपेक्षित धक्का वाटावा , मला सांग मी आयुष्यात कधी न तुला call केला , न फालतू मेसेजेस , जे ही काही whats app वर पाठवलं ते मात्र तू ग्रुपवर आग्रह करून बोलावल्या नंतरच च होत ना , मी तुझ्या मला ग्रुपवर तू मला  मिस यु म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता घेतला पण मला माझी पायरी ओळखून वागता आल नाही , मी आज खूप मोठा blog लिहिणार होतो इतर विचारांचा जो की मी अस का बनलो असेल यावर एक ग्रंथच आहे आणि इतरही काही विषयांवर ज्यावर phd केल्या जाईल पण ताई मी कधी तुला लव्ह यु म्हणालो नाही , आणि असेल तरी लव्ह ची डेफिनेशन ग्रुपवर मी च पाठवलेली , मी जर तुला पाठवलेले मेसेज आवडत नसले तर तुला मी तेंव्हाच मला कळव अस कित्त्येकदा सांगीतल पण तू कधी तस कळवलच नाहीस , मी तरी तुला दोष देणार नाही, पण दोष माझाही नाही हे जर परमेश्वर असेल? तर तो जाणतो , मला तुला मिळवायच नाही ,ना मी गळ्यात पडेल कोणाच्या अशा स्वभावाचा आहे , पण फक्त मला तुझ्या मनात एक विश्वासाची जागा पाहिजे होती , मला तुझ्या मेसेजेसची सवयच होऊ लागली आणि मी मनानी भावूक होत गेलो, मी काही रोजपासून देवाला तू माझ्या घराची शोभा वाढवणारी गृहलक्ष्मी बनो अस मागितलं ,आणि ते ही अस की तुझ्या मनापासून , पण
 मी कधी तुझ्या वरपांगी सौंदर्याची तारीफ केली नाही , न आयुष्यात कधी मी तुला आता बोलू शकेल एक भाउ काय कशाच नात्याने कारण तू block केलस आणी माझ्या निरागस भावनांचा खेळच झाला ,
अपेक्षा  इतकीच होती की मी परवानगी घेऊन बोललो , हे पाठवू का , ते पाठवू का, विचारूनच जे काही पाठवल असेल ते ग्रिटिंग , मेसेज पाठवले मग अस असता तडकाफडकी मला न रागवता अस block नसत न करायचस , मी स्वताः ला आरशात पाहायचो तर तुझा चेहरा नाही तर तुझे पाठवलेले हसरे स्माइलीज दिसायचे , मी काल तुला तुझ्या आत्मसन्मानाला डीवचून तू मला मी का येणार नाही तू विचारावस या हेतुने
 तसा मेसेज नव्हता केला , मी इतका भावूक होतो की मी तुझा  मेसेज न पाहता किती रडलो तुला कल्पना नसेल , माझ शारीरिक नव्हे तर आत्म्याचच मरण होत होत ते , तू जर मला कधी निट समजावून सांगितलं असतस अन मी तरी तुझ्या मनाविरुद्ध वागलो असतो तर तू block केल्यावर वाईट नसत वाटलं कारण ती माझी घोडचूक असती ,
तू जर मला परत बोलवलं नसतस तर मी कधीच  आलो नसतो , पण मन मोकळ अगदी जे मनात होत ते सांगितलं तुला तर मी लगेच इतका वाईट झालो तुझ्या नजरेत की तुला काहीच न कळवता block कराव वाटलं ? हे च माझ खर मरण होत, की मी तुझा विश्वास गमावला …. 
देवाशप्पथ मी तुला इम्प्रेस करायला काही नाही केलय जे काय पाठवलं ते तुला आवडून आनंद मिळावा याकरता , आणि माझी एकमेव इच्छा व्यक्त केली ,  त्याचा तू विपर्यास करून block च केलस , मी कधी तुझ्या घरी आल्यावर तुला म्हणालो - की  आपण एकट्यात बोलूया ? बाहेर जायचं का ? मग का तू मला अस टुकार समजलीस केवळ मी मन अगदी मोकळ करून बोललो तर ? मी काय तू नाही मिळालीस तर उडी टाकेल म्हणालो की जीव देईल म्हणालो ? सरळ जे मनात होत ते ब्लोग वर  वाच म्हणालो , हा blog आपण तिघे म्हणजे तू ,मी आणि देव यांनाच माहित होता , तू काय  आनंदी झालेली नकोयस का मला ? तुझा वैयक्तिक प्रश्न असतो तो कि लग्न करायचं की नाही पण तुला कधी मी तस विचारलं का? तुला जर कोणी आवडलं तू त्यांची झालीस तर मी काय jealous होणार होतो का ? उलट आनंदाने त्या सोहळ्यात नसतो का सहभागी झालो , फक्त मी माझ स्वताच एक मन मोकळ केल जे तुला वाहील गेल तर तू इतकी चिडलीस की काही न reply देता block केलस , मी काय तुझ्यावरच कविता बनवतो का ? सर्वांवर जस सुचेल तस काही रचतो तर मी काय त्याना तशाच नजरेनी पाहतो का? मी तुझ्यावर चालीसा रचली त्यात तुझ्या मनाच्या सौंदर्याशिवाय मी काही पाहील का ? जे सुचल , ज्यांनी तुझ मन जिंकाव वाटलं ते मनापासून सुचलेलं काव्व्य होत , तू मला त्याबद्दल thanks तरी पाठवलस ?  मी जीव नक्की लावला , पण तुला गचाळ वाटेल अस कधी पाठवलं नाही , मन अगदी मोकळ करत बोललो आहेच पण त्यात अश्लीलताच का पाहिलीस तू ? माझ्या भावना काय फूटball  होत्या का अस block करून लाथाडायला ? मला तू जर तो लास्ट मेसेज पाठवून block नसतं  केलस तर मी aaeeshappath - ओके या शब्दाशिवाय एक किंचित मेसेज नसता पाठवला , पण block करून चपराकच दिलीस , मी तर तुला शुभेच्छा पण विचारून पाठवल्या ना मग मला वाह्यात ठरवायची काय गरज होती? मी तर ग्रुप admin वर जोक देखील वहिनीना तो  तुम्हाला रिलेटेड नाही म्हणून पाठवतो इतकी भावना जपतो हरेकाची आणि तू मला इतक शुद्र विचारांच का समजलीस की block च केलस ?
तू अद्वातद्वा बोलून रागवली असतीस तरी अजिबात वाईट नसत वाटलं , आज मी कंपनीत गेलो नाही इतक मन विटल , मी सगळ्यांशी सोबर वागून , polite appearance ठेउनही काय ठेच दिलीस मला मनाला , मी तुला कधी विचारलं की का मला बोलत नाहीस ? का अबोला धरलायस ? काय म्हणून तू अस तडकाफडकी block केलस ? असो मला उत्तराचीही अपेक्षा उरली नाही , न कुठली आशा मनात उरलीय , न मी ती कुठली वाईट हेतूने  ठेवलेली , तुला जर राग आला तर तो व्यक्त ही करावा न वाटावा इतका मी gone case होतो का ?

असो आजपासून नंतरची माझी हरेक पहाट  आनंदी असेल कारण त्या माझ्या विश्वात मला आई बाबा आणि माझ्याशिवाय कोणीच नसेल , ते आहेत तोपर्यंतच मी असणार नंतर मी सरळ विष घेउन मरणार आहे कारण मला त्यांच्याशिवायच कोणी निस्सीम भरवश्याची कोणी तूच वाटलीस , तुझ्या आई -बाबांच्या अगदी किंचित खालोखाल प्रेम केल तुझ्यावर , त्यांच्या प्रेमाच्या पुढे कोणाच्या इतरांची काय तरहा वा तुलना ?
आई बाबांच्याइतक प्रेम तर कोणी करूच शकत नाही , पण तू अस निव्वळ समजून न घेता , न समजावता अस block नसत करायचस , असो , विश्वासाला तडा गेला की काहीच सांगायचं उरत नसत , काच तुटली की जुळेलही पण ओरखडा कायम राहावा तस काहीस झाल , 

तू blogs जर निट , शांत चित्ताने वाचले असतेस तर चिडली नसतीस पण , माझ bad luck , 
आयुष्याने मला रडवलं आणि तू काही त्याहून वेगळी नव्हतीस ,
असो बाय मी आता कधी आयुष्यात बोलायच्या लायकीच राहिलो नाही न राहील , काही रहस्य्य जी तुला माहितीच नाहीत ती जर कळली असती तर तू माझा द्वेष कधी आयुष्यात केला नसतास . ओवर and i  clean bold . बाय , न तू एकाही मेसेज वर comment केलीस

दिलं कळवून एकदाच आज individual account वर  तुझ्या बद्दल किती  विचार करतो मी पण हा लोफर पणा  नाही ह , खरतर मी का कळवतो  तुझ्यावर ,  तुझ्या भावना जपण्यावर  आहे हेच कळत नाही , काल आईनी तगादाच लावला अमेय काय रे किती दिवस अस मला एकटी ठेवणार? तुला आमच्या नंतर कोण आहे ? पण तिला कळत नाही आईला की अग तुम्ही आहात तर मला जगण्यात रस आहे नाहीतर मी कोणासाठी नाही तर स्वताःच काय माझ अस्तित्व ?
मला जेवण  खाववत नाही अस तिनी स्वता : ला एकट  समजल की , अग तू शेजारी काकुंशी बोल, भजनातल्या बायकांत रमव मन , बेबी मावशी कडे जा , बाजारहाट कर , सिरीयल्स पहा ज्या कॉमेडी आहेत , पारिवारिक भांडण काय पाहून मनस्ताप ?

आणि काय म्हणून लग्न करू? college life किती गचाळ पाहील , बर मला  ह्या नात्यावर विश्वास नाही आणि एकाच मुलीवर प्रेम करतो , तिच्यावरच विश्वास आहे पण ते कस सांगाव तिला ? मग काल तो blog बनवला मनातले  मांडून आणि तुला मागणी घातली , मी का कोणाला आवडाव? मी कोणावर प्रेम करतो तिनी माझ्यावर प्रेम कराव  अट्टाहास नाही ना अजिबात , मला फक्त आणि फक्त तुझ्यावर   विश्वास आहेच व राहिलच , मी कुलदेवतेची शप्पथ घेतलीय , नवरात्रात नऊ दिवस  नंदादीप तेवत होता त्यावर उजवा हात धरून शप्पथ वाहिली की लग्न  केल तर तुझ्याशीच ते ही तूच हो म्हणलीस आणि ते ही तुझ्या मनापासून तरच नाहीतर लग्न करणारच नाही आणि ते ही मी खूप वेल settled झाल्यावर आणि मला  माझी खरी  ध्येय गाठायचीयत काही जन जागृती करवून , करून आणि  सह संयुक्त कुटूंब पद्धतीच  महत्व पटवून द्यायचंय , मला जी लोक बहुदा मजूर लोक गरीबीचा राग बायका मुलांवर काढतात त्याना तस करण्यापासून रोखायचंय , मला कोणी गरीब पोर अन्न न्याहाळत असलेल पाहवत नाही त्याना त्यांच्या आवडीच खाद्द्य द्यायचंय , ते गरीब पोरं  बिचारे naturals , gilato vento , baaskin  robbins दुकानांबाहेर ice-creams रंग न्याहाळतात  आशाळभूतपणे त्याना त्या चवी चाखवून त्यांचे  हसरे , समाधानी चेहरे पाहायचेयत, कोणी innocents लोकाना त्रास देतात त्या मानवतेच्या शत्रूना धडे शिकवायचेयत , मला असं चित्र नकोय समाजात जिथे  कोण्या विवाहितेला मुलबाळ होत नाहीयेत वा मुलीच होतायत त्यांचे हाल होतायत ,
मला सर्वत्र आशावादी वातावरण आणि सुरक्षितता हवीय , असा समाज हवाय जिथे watchmans ठेवायची गरज पडणार नाही अस रामराज्ज्य आणायचंय , मी कस समजावू आईला , माझा कधी या वातावरणात जीव गुदमरतो , कधी तडजोड करून जीवन ढकलतोय , मला कुठेच सुरक्षित नाही वाटत तुझा आधार वगळता , तुझा आधाराचा हात मला कधीच सोडायचा नव्हता , आणि आधार म्हणजे इतकच हवय की माझे आई बाबा , तुझे आई बाबा आनंदी आणि सुरक्षित फील करतील , जिथे आपण एकत्र असलो असतो तर आपण दोघांनी या पाचही जणांची काळजी घेत संसार केला असता , मला तू झोपलीस की तुझ्या निरागस चेहऱ्यावरील समाधानाचे , हसरे भाव पाहायचे वाटले , आणि हे तुला माहीतही न  पडू देता , तुला  रोज आनंदाचे सरप्राईझेस द्यायचे आहेत , म्हणजे असे गिफ्ट्स जे डोळ्याना नाही दिसायचे एकवार पण तुझ्या भावनाना आनंददायी फील होतील . मी पागल असेल तर पागल म्हणा पण मी जगरहाटीनुसारच का चालावं ? का मी तडजोडी करू ह्या स्वप्नाशी की मला सर्वांच सुख नाही मिळू शकणार आणि माझं  सुख त्यांना ती सर्व सुखं  देण्यातच  आहे व राहील , का करू पैसा बचत सगळाच उरलेला काही गोर गरिबांत त्यांच्या गरजेच्या वस्तू त्याना द्यायला खर्चायच्यायत , मला सुख हे वाटायचंय , एकट्याला भौतिक वस्तू , चविष्ट खाद्द्य नाही उपभोगायच तर सर्वांत वाटून त्यांचे समाधानी चेहरे पाहून मनाला आनंद वाटून घ्यायचाय , 

मी तुझे मेसेजेस न्याहाळत डोळ्यांतील आसवं गाळलीयत , मला सतत आता तू ह्यावेळी काय करत असशील अस वाटत रहात ? तुला मी सुरक्षित वाटण्यात भरवसा असण्यात की मी तुला आनंदी ठेवील ह्यात माझा विजय आहे , मी whats app वर तुझ्याकडुन account blocked झालो तेंव्हा पासून रोज थोड थोड मनानी मरत आलो , अस वाटायच मी इतका माझा तिरस्कार वाटावा असा आहे खर ? मी रोज देवाला विनवण्या केल्या की आज तरी तुला मला unblock कराव वाटू दे , मी परत नाही मेसेज करायचो,
मी आत्मसन्मान फार जपतो पण तुला मनोमन गृह्लक्ष्मी मानल मग तुझ्यासमोर कशाला स्वता:चा मान ठेउन घेउन भाव खाउ अस वाटल , होउदे माझे अपमान पण मी सर्वाना हसवत राहणार , मला तुला गमवायची भीती वाटली आणि केल propose ,

मला मागून काही नकोय मला कोणी मनापासून माझ व्हाव वाटेल अस वाटत होत, मी परत नाही येणार whats app वर , कारण तुझ्याकरता मनापासून whats अप्प वर आहे , गृपवर सगळ्यांत रमलो कारण तू आहेस , तूच मला बोलली नाहीस तर मी कशाला येऊ गृपवर ?
अन whats अप्प वर तरी ? पण मित्रांचीही मन भावना जपायला येतो ज्याना गमवायच नाही असे  आहेत ते ,

तुलाही मन आहेच  , तुझीही मत आहेतच  , मी सर्वांच्या कलानी घ्यायला पाहिजे , मला तू माझ्यावर तुझा आत्मसन्मान गमवून मला विचारलेलं  नकोय , मी खर प्रेम करतो अस म्हणण्यापेक्षा अस म्हणेल की मी रोज त्याची प्रचीती तुला येईल असे सिद्ध करून दाखविल सदवर्तनातून   , मला माझे शब्द , वचन खोटे पाडून स्वता:च्या नजरेत पडायचं नाही आणि तुझ्या किंवा इतरांच्या तर नाहीच , मी कुठल्याही पदार्थाची चव नाही   चाखू शकत , तुमच्याकरता जगायचंय  म्हणून अन्न पोटात ढकलतोय , चव कशातच वाटेना , कारण खर सुख हे आनंद वाटण्यात आहे हे पक्क माहीत झालय , मी रोमांटीक , सिरियस , प्रसंगानुरूप हसविल अस सर्व वागेल , बोअर नाही करणार , न होउ देणार, 
पण मी सर्वाना मग आनंदी कस ठेऊ ? मला तू तर बोलतही नाहीस.  
मी तू मेसेज पाठवल्याशिवाय नाही येणार whats अप्प वर कारण मला माझ लादलेल प्रेम नकोय , मी आहे तस आहे , तू सांगीतलस ते पटेल असच असेल ते रुचल तर स्वता:त बदल करील, पण सर्व जग आणि तू पण आनंदी आहेस तर जगायला अर्थ वाटेल नाहीतर कससच आहे आयुष्यं

त्या वाढदिवसाच्या हॉटेल पार्टीतले dp फोटोतले बॉस काका किती हुशार वाटले , चेहरयावर हुशारी अन अनुभवाच तेज , तुमचे फ्रेंड सर्कल खरच हुशारच असणार . तुझा samsung mobile शुभ्र धवल रंगाचा तुझ्या मनासारखाच शुभ्र अन नितळ रंगाचा आहे,
बोलली  नाहीस तू तर तुझा राग नाही हं   , मी कधीही तुला, सर्वाना  चांगलच वागवॆलच , काळानुरूप स्वभाव बिघडवणार नाहीच. मी जातो , येतो तेंव्हाच म्हणावं वाटेल जेन्व्हा तुला  काही मनापासून  बोलाव वाटेल , तुझा रोष ओढवून नाही घ्यायचा मला . काळजी घे हं (म्हणजे तू सर्वांची न सांगता घेतेस पण स्वता:ची काळजीपण  घे,  ) विश यु every success इन युवर लाइफ़ , माझं  मन मरूदे , त्याची तीच लायकी आहे सर्वाना त्रास देत ते पण कोणी त्यांच मन मारून मला आनंदी ठेवलेलं नकोय , मला sympathy नको , मनापासून असलेल्या तुझ्या हास्य प्रतिसादाची alopathy हवीय जी मनाच्या तब्ब्येतीला बरं  करत राहील ,

Saturday, 13 December 2014

                                     ]] श्री गणेशाय नमः [[
ख्रीस्तांत जशी CONFESSION CONCEPT  आहे , जशी आपल्यात प्रायश्चित्ताची तसच तुला देवी मानल , जाणलंय , अन मनाशी खात्रीपूर्वक ठसवलय तर हे तुझ्या समोर मी मनोमन केलेलं प्रायश्चीत्त -

मी ह्या इंटरनेट कॅफे वर आज रोजी भर ऐन लक्ष्मी घरी यायच्या तिन्हीसांजेच्या शुभ समयी हे जे हातांच्या बोटांच धाडसी पाउल उचलतोय म्हणजे जे काही टाईप करतोय ते अगदी अंत:करणापासून , मनोमंदिरातील गाभारयात वसणारया परमात्म्याला स्मरून पण प्लीज तुला माझी हात जोडून, साष्टांग दंडवत घालून विनंती  आहे की प्लीज तू प्रिजुडाइस होऊन , चिडू नकोस , कारण तुला त्रास झाला तर त्याचा सगळ्यात कैकपटीने जास्त त्रास मला होईल ज्याची तू कल्पनाही नाही करू शकायचीस, आणि माझ्या डोळ्यांत संथपणे जमलेल्या आसवांना स्मरून हे टाईप करतोय आणि जे काही पाठवतोय तो ना फिल्मी दुनियेमुळे झालेला परिणाम ना मराठी साहित्यातील एखादा आविष्कार , पण तरी तो माझ्या  जीवनपटाला केवळ तुझ्या अगदी मनापासूनच्या उत्तराने एकतर ऑस्कर मिळवून देईल वा सपशेल आपटवील .   माझ्या या मनापासूनच्या का असेना पण या शब्दाना भुलून तू  तुझ उत्तर देणारी नाही आणि हे सर्व तुझी दिशाभूल करवायलाही नाहीत , ना मी ही दगडावरच्या आडव्या रेघेप्रत ही CRYSTAL CLEAR TRUTH वाक्य काही तयार करवून आलो ना बुद्धीवर जोर देऊन काही पाठ करवून तयारी करवून पण, सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेउन आणि सर्वाचा खास करून माझ्या आई बाबांच्या , तुझ्या आई बाबांच्या (मामा मामीच्या ) आणि तुझ्या भावनांचा अगदी सुविचार करून हे कथन पाठवतोय , मी कदाचित तुझ्या आणि सर्वांच्या लेखी हे चुकत असेल पण माझा परमेश्वर जाणतो की माझ तुझ्याबद्दल किती निरागस मत आहे , मला माफ कर नाही म्हणणार तर कायमच WHATS APP च नाहीतर संपर्क ही BLOCK कर पण माझा तिरस्कार करू नकोस , कारण मी तो देवतेचा रोष ओढून घेण ठरेल , तू BLOCK केलेलस तर तुझा DP फोटो मी देवी शारदेचा ठेवला होता आणि जरी तू BLOCK केलस तरी मला प्रधान स्वारस्य हे तुझे D.P. वा तुझ स्टेटस वाचण्यात नसून तुझ मन वाचण्यात होतच  व असेलच , जरी मी हे पाठवताना  माझा चेहरा डोळे दिसत नसले तुला तरी ते खोट कथन करत नाहीयेत , आणि मी स्वता:ची फसगत समजतो दुसऱ्याला फसवण कारण मी गरूड पुराणही वाचलंय आणि मला ही मेल्यावर देवाच्या दरबारात शासन वा न्यायाकरता चित्रगुप्त उभा ठेवील हे मी जाणतो . 
मी हे ही जाणतो की तीर्थस्वरूप मामा मामींची (तुझ्या वयस्कर आई बाबांची) तुला तुझ्या जीवापाड काळजी आहे जशी मला माझ्याही मला माझ्या  प्राणाहून प्रिय आई बाबांची असते तशी मी ही त्यांची काळजी घेईल , मी तुझ्यावर प्रेम आहे , प्रेम करतो अस नाही तर अस म्हणेल की मी ही त्यामुळे जगतो अस म्हणेल इतक मी तुझ्या भावनांचा सुविचार करतो , माझे मेसेज समजायला कठीण असतील पण मला समजण तुला गरजेच नाही कारण तू जशी आहेस , जशी वागशील, जशी होतीस , जशी होशील तस मी तुला स्वीकारीलच , तुला दुसर कोणी आवडत असेल, त्यावर प्रेम असेल तर शप्पथ जी मदत करता येईल ती मी मामे भाउ या नात्याने मनापासून करेल तुझ भल होईल अस तुम्ही ठरवत असेल , मी तुला ही तुझ्या कायमस्वरूपी , निरंतर , सदोदित साथ देशील का ? ही विचारणा करतोय खर पण मला अंथरूण पाहून माझे पाय पसरायला पाहिजेत , मी न दिसायला सुंदर , न विद्वान , न फार स्थिरस्थावर पण माझ्या  मनाने म्हणजे मीच तुला पाहिजे ती सुख देण्याची शप्पथ घेतलीय तर मी तुला कधीच कशाची कमतरता पडू देणार नाही , तुझ्या स्वप्नाना तिलांजली देऊन तू मला होकार नको देऊस , आणि ते मला अजिबात नको , कारण माझ सुख हे मला तडजोडीवर नकोय तू केलेल्या , तर मी तुझ्या करता माझ्या काही द्रूढ इच्छांचा त्याग करू शकलो तर मी माझ जीवन धन्य झाल समजेल , मला माहिती आहे की तू सात वर्षानी वय , अनुभव , हुशारीने (जे की मी अजिबात तुझ्या पासंगाला नाही) इतकी  मोठी आहेस , सर्वगुणसंपन्न आहेस पण तरी मी माझ मन मोकळ करतोय की मला तुझी सोबत सातच नाही तर जर जन्म मिळाला तर जन्मोजन्मी पाहिजेच आणि मला खात्री आहे की आपल सद्वर्तन आपल्याला पशु जन्म द्यायचा नाही तर ह्याच योनीत जन्म देईल , वयाचा अंतर विचार हा मी सचिन तेंडूलकर , फराह खान , इरफान अखतर , किंवा आजून कोणी जे पतीपेक्षा जास्त वयाची वा पत्नीपेक्षा सहा सात वर्ष कमी वयाची अशी यांची उदाहरण डोळ्यांसमोर ठेऊन नव्हे तर त्यांच्या प्रेमातील यशालाही जाणून ठेवलीयत , मी हे पवित्र अन कायमच बंधन फक्त जुळवल तर तुझ्याशीच अन तेंव्हाच जुळवेल जेंव्हा आणि जर मी वर्ग १ अधिकारी होईल कष्ट करून तेंव्हा येत्या १-२ वर्षांत. 
मला तुला मिळवायचं नाहीये  तर तुझी फक्त प्रेमाची साथ मिळवून तुला सर्व सुख मिळवून द्यायची आहेत , जी तुला माझ्याहून जास्त कोणी देऊ शकल तर माझी जितच असेल त्यात कारण मी हारून जिंकेल जर तू आनंदी असशील तर , माझे तुझ्या भल्यासाठीचे नवस फिटले वाटेल , 
मी लग्न करणारच नाहीये हा पण केला आहे पण तो पण फक्त तुझ्याकरता मोडेल , इतर कोणाच करता नाही , 
कुलदेवतेची शप्पथ जर लग्न केलच तर फक्त तुझ्याशीच नाहीतर अजिबात लग्न करणार नाहीच कारण मी ज्या इतराचा विचारही करत नाही त्यांच्याशी काय नात निभावून त्याना आनंद देऊ शकेल? 
त्यांच नुकसानच आहे त्यात , मला मिळणार नाहीत अस नाही , तेच तुझ्या बाबतीत पण ; प्रेम नसेल तर इतर कोणीशी नात जुळवून कोणाची फसगत करायचं पातक मी नाही करणार. 

मी तुला तुझ्या अपेक्षेपार सुखात ठेवील इतकी केवळ खात्री , ग्वाहीच नाही तर भिश्माप्रत वचन देतो , कालानुरूप लोक त्यांचे विचार बदलतात पण मी तास नाही करणार , तुझी साथ कधीच नाही सोडणार , सगळे असच म्हणतात पण नाती ही अपेक्षाभंगच करतात अस आपल ठाम मत असल तरी मी तस दुर्वर्तन आईची , देवांची (आई माझी देवताच की ) तुझीही शप्पथ जी मला त्यानंतर सर्वांत केवळ प्रियच नाही तर पूजनीय , वंदनीय आहे, ३३ कोटी देवांची शप्पथ घेउन कळवतो की करणार नाही . मी ३३ कोटी देवांची शप्पथ खोट नाही बोलणार लग्न खेळ तर फक्त तुझ्याशीच करील नाहीतर अजिबात करणार नाही , माझ्या मनात कुठलही किलविष, वाईट भावना नाहीयेत हे तुला वचन देतो , मी तुझ मनाच सौंदर्य क्षणोक्षणी अनुभवलंय , मी तुला आवडत असलो तर प्रेम नको करूस तर तुझ्याही माझ्याबद्दल तशाच तितक्याच पवित्र, निर्धोक , निर्भीड , ठोस भावना असतील  तरच माझ्याशी ह्या नात्यात यायचा विचार कर , मी तुझ्या उत्तराची आजन्म वाट पाहील , अगदी मेल्यावरही जर जिवंत राहिलो तर असा राहील की तुझ्या मनांत विश्वासाच भक्कम घर करून …. मी तुला माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंतची वेळ देतो उत्तराला कारण तू नाही तर कोणीच नाही आणि हे तुझ्यावर बंधन नाही , मला माझ नात हे तुझ्यावर लादून नाही निभवायच तर तुझ्या भक्कम विश्वास असेल त्यावरच निभवायच , तुझा पूर्वे इतिहास काय ?, तुझ्या काय व्यथा ह्या माझ्या प्रतिज्ञेत आडकाठी नाही ठरणार , मी समाज काय म्हणेल याचा विचार नाही करत कारण समाज कोणाला जगू देतो नीट ? पण तू मात्र तुझ्या मनात तस समाजाच  आल तर माझ्याशी नात नको जुळवूस , मी नव्या नात्यात  नाही झालो तुझा तरी एक आदर्श मामे भाउ बनून सदैव तुझा केवळ  हितचिंतकच नाही तर तुझ्या चांगल्याचा पुरस्कर्ता राहिलच . माझ्यावर विश्वास ठेव अस नाही प्रतिपादन करणार मी कारण मला तुझा नि:संशय होकार हवाय पण मी विश्वासघातकी नाही हे ही खरे , माझ्या आयुष्यातील एकही बाब मी तुझ्यापासून लपवायचो नाही पण तुझ्या काही आठवणी तू सांगाव्यास याचा मी आग्रही नाही जर तुला त्या आठवणी त्रासदायक असतील , जर तुझ्या त्रासदायक कुठल्याही आठवणी मी माझ्या निस्सीम , निर्लेप प्रेमाने मिटवू शकलो तर जन्म सार्थकी लागेल माझा , 
हे आकर्षण किंवा आवड म्हणून नाही तर खर प्रेम म्हणून कळवतोय कळकळीने ,  
तू जर मला नाकारलस तर मी जगू शकेल पण कोमात गेलेल्या अन कधी न रिकव्हर होऊ शकणारया देहासारखी दुरवस्था होईल माझी हे मात्र १०० पैकी प्रमाण ठेवल तर १००% खरं 
 पण जे  तू EMOTIONAL BLACKMAIL म्हणून नको ग्रुहीत धरूस . 
 मी तुझ चांगलच नाही तर कधी बालीश, चिडक वर्तनही सांभाळेल , तस मुळात तुला चीड येउच द्यायचा नाही , तुला जितका वेळ झोपायचं तू झोप, t.v.  पहा , कितीही मोठा आवाज कर radio चा नाही मी तुझ्यावर चिडणार कधी  कारण की  मला पक्की खात्री आहे की तू माझ्या आई बाबांची खूप सेवा करशील , तू स्वयम्पाक नको करूस , मी करील , माझ्या आवडी निवडीपुढे  तुझ्या चवींना प्राधान्न्य देईल, अग्रक्रम देईल पण प्लीज माझा राग नको करूस , केलास तरी कर पण मला सोडून नको जाउस अस कितीही मन आर्जव करतय पण तुझ्या सद्सद्विवेक बुद्धीला जो पटेलच नाही तर खात्रीशीर असशील तोच निर्णय घे. मी तुझ्याही  आई बाबांची दुर्गामावशीचीही खूप काळजी घेईलच , पण मी रडतोय की आपण एकत्र कसे राहू एका छताखाली कारण की मी इथे राहतो आणि तू तिथे . 
मला हे गाव अजिबात आवडत नाही , मुंबईच आवडत पण ते केवळ तुझ्यामुळे आणि तसाही मुंबई आवडतच पण माझ तेच गाव जिथे माझे देवतुल्य मायबाप , 
मी हे नाही सांगणार मी तुझ्या करता काय केलय , मी नेहेमी असाच समजतो की मी तुझ्याकरता काहीच चांगल केल नाही , न मी तुला कधी तुझ्यावरील संकटांत साथ देऊ शकलो , पण तस नाही होऊ द्यायचंय मला अजिबात आतापासून , मी मागे जेन्व्हा तुला वाटलं मागणी घातली तेंव्हा मी खरच तसा तितकासा विचार नव्हतो करत पण नंतर तुझा खूप खरच सुविचार करून तुझ्याबद्दल अगदी प्रेमळ मताने भावना निर्माण झाल्या केवळ तुझ्याही भल्याकरता , 

माझ्या ह्या सत्त्य कथनांनी अजिबात इम्प्रेस करत नाहीये तुला तर माझ मन खरोखरीच मोकळ करतोय , आज मी हे कदाचित शेवटच येण  ठरेल तुझ्या मनापासूनच्या ज्या काही असेल त्या निर्णयाने , मी खरच खूप दचकलो , बिचकलो तुझ्या भावना तर दुखवत नाहीये ना वाटून पण मी मनात काही भावना दडवून ठेवत नाहीये , मला तुझ्या माझ्यावरील विश्वासाची ज्योत कायम तेवत ठेवायचीये ती बदमाशीने नाही तर तुझ्याशी जस आहे तस खरखुर आणि जे सर्वालेखी चांगल असेल अस सद्वर्तन करून , मी जितका समजायला कठीण तितका सोपा , मी जितका भावनिक तितकाच मनमोकळा , तितकेच स्वता:चे भावनिक दु:ख  दडवणारा अन कधी ते सांगून टाकणारा आहे , पण माझी जी तुझ्या नात्याबद्दल ची मत आहेत ती यात्किंचीतही डगमगणारी नाहीत , मी तुझ्याशी  नव नात जर तू ते ही तुझ्या  मनापासूनच माझ्याशी जुळवलस तर ते जुळेपर्यंतच नाही तर माझ्या श्वासाच्या अन्तापर्यतच नाही तर माझ्या मरणानंतरही कायम विश्वासपात्र अन सुरेल ठेवीलच, मला नकार द्यायला कचरू , बिलगु नकोस मनात कारण मी तुझ्या मनातील भावनाना पुजतो , माझ्या भावनांचा तू विचार करच अस नाही म्हणणार. तू तुझ स्वातंत्र्य गमावलेल नकोय मला , तर मला सदैव तुझ्या काही आनंदात आनंद मानून कायम जगायचंय , मी तुझ्या सदगुणांवर प्रेम केलं  तस चुकांवरही करेल , तुझ्यावर मी तेंव्हाच चिडेल अर्थात  प्रेमानेच व मोहक स्वरांत , उच्चारांत - जेंव्हा तू तुझी स्वता:ची काळजी न करता माझ्या चांगल्याकरता  झटशील, सुखात सगळेच साथ देतात पण मी दुखातही तुला साथ देईल कारण की जी दु:ख तुझी असतील ती माझी कशी नसतील? ती माझीच असतील , मी कधीच तुला त्रास होईल , भावना दुखवल्या जातील अस दुर्वर्तन करायचा नाही , या जानव्याच्या ब्रम्हा , विष्णू , महेश गाठीची शपथ , ह्या एकमुखी रुद्राक्ष घातलेल्या माळेची शप्पथ तुला त्रास नाही देणार कधीच, तुझ्या भावनांचा केवळ अग्रक्रमानेच नाही तर त्या भावना जपण माझ जिवनध्येयच आहेच (मी 'च' वापरतोय शब्दाशेवटी कारण ती सत्त्यवचन देतोय , आणि हे शब्दच नाहीत तर माझ्या मनातील कोरलेली भावना आहे जी तुला कळवतोय , येणारे नववर्षच नाही तर माझ अस्तित्वच तुझ्या होकार , नकारावर चांगल वाईट ठरेल ,
कारण सगळी सुख जरी माझ्या पायांशी लोळण घालतील , पण तू नसशील  तर सुख ही कस्पटासमान आहेत कारण माझ्या आईबाबांच्यासमवेतच तुझ्याही, तुझ्याही family च्या भावना जपण हे मला माझ्या प्राणांहून प्रिय आहेच , मी चुकीच कधी वागलोच नाही अस नाही म्हणणार कारण मी कधी पागल , कधी हुशार , तर कधी अतिहुशार तर कधी दीडशहाणपणानेही वागलो असेल ना? मी परफेक्ट नाही चांगल वागण्यात कदाचित कोण्या लेखी पण तुझ्या साथीने तू मला सुधरवशील? मी तुला डोक्याला त्रास देतोय न नकळत हे सर्व वाचायला कळवून ? मी तुझी  हरेक इच्छा जाणू पहातो , प्रयत्नांनी पूर्ण करू पाहील , बोल देशील मला साथ सातच नाही तर मिळाले तितके जन्मोजन्म? 
समाज ,  वय, इत्यादीचा विचार तू कर हरकत नाहीच कशाचीच मला पण माझ तर तूच जग झालीस , मी भावनेच्या भरात नाही तर सद्भावनेने , कट्टर तुझ्यावरील श्रद्धेने कळवतोय . मी तुला इतक चांगल्या आठवणी सांगू शकेल ज्या तुझ्याही अंतर्मनात आहेत कारण मी तुझ मन वेगळ समजताच नाही ना माझ्या मनाहून , मी माझी मत लादणार नाही , तुला पटवू पाहणार नाही ,तर माझी निस्सीम श्रद्धा आहे तुझ्या चांगुलपणावर , हे जे ही काही सत्त्य कळवलेय ते FONTS  ROTATE होतील P C वर पण माझ्या मनानी थोडेही देखील कधीच रोटेट होणार नाहीत , खोटे ठरणार नाहीत . 

तू तुझे निर्णय घ्यायला समर्थ , सक्षम आहेस हे ही माझी कदाचित तुला सांगायची लायकी नसेल पण मी तुला जे ही काही सांगितलं ते मनापासून , हे वाचून मला लगेच CALL नको करूस , मी बोलू शकायचो नाही हायपर  भावनात्मक   होऊन , आणि तुला उद्या सुट्टी ना तर तुला ही यामुळे ताण वाटू नये म्हणून आजची ही तिन्हीसांज निवडली , मी अजिबात चुकलो नाही कारण जे मनात आहेच व असेलच ते सांगितले, तुझ्याकडून होकार असेल तर माझी केवळ स्वप्न , इच्छाच, मनीषाच  नाही तर प्रतिज्ञा पूर्ती केली आहेस तुझ्या कृपाशिर्वादाने अस वाटेल , तू मला परत आता कायमचच  UNBLOCK कर जर मी तुला चूक वाटलो तर , मी खर तुला आपल्यातील काही शाब्दिक शीत युद्धानंतरच समजू शकलो आणि तुझ महात्म्य कळाल . तू CONVENT माधय्माची आहेस तर हे सत्य बोल समजणे कठीण गेले असेल तर माफ कर , 

 तुझ्या आठवणीवरही जगेल मी भलेही ते जगणे जगणे नसेल , मी फक्त तुम्हाला भेटायला आलेलो मुंबईला , OFFICE काम तर फोनCALL वरही झाल असत पण मी खोट बोललो कारण मला तुला ती शनी चालीसा द्यायची होती , माझ्या जपमाळेला कोणी इतरांनी स्पर्श केला तर चालणार नाही असा दंडक गुरूंनी दिला पण तू तुझे घराचे , माझे आई बाबा मला इतर कसले? उलट तुझ्या दैवीस्पर्शाने ती जपमाळ विभूतीमय अन पावन झाली ,

प्लीज हे कोणाला नको कळवू कारण मी बदनाम झालो तर हरकत नाही तुझ्यावर कोणी चिडायला नकोय आणि मी तुझ्यावर माझ्या  मनापासून रचली ती चालिसा मी गृपवर नाही पाठवली ना इमेज कारण तू इतरांत लाजू नयेस , आणि कोणाला विचित्र वाटू नये , कारण तुझा अपमान माझा अपमान , तुझ माझ सुख दुख जर काही वेगळ असेल तर तुझ्या लेखी  काही अंशी असेल तर पण मला नाही वाटत पण तू माझी खूप भावनांची कदर करून काळजी करतेस हा माझा दृढविश्वास आहेच व राहिलच , मी WHATS अप्प वर तुला हे वाच म्हणण्याची विनंती करणारा मेसेज आत्ता पाठवील पण नंतर तुझा निर्णय जो काही असेल तो मनापासून घे , माझ्या शब्दाना भुलून नको , तुला विश्वास असेल तर ठेव , मी तुझ्या हरेक मला पटणारया निर्णयाला अत्त्यादर करीलच कारण तुझ्या भावना मी माझ्या समजतो पण माझ्या भावना तू तुझ्या समजायच्या की नाही तू ठरव. आय लव्ह यु म्हणण्याइतपतच मर्यादित प्रेम नाही माझ तर मी तुझ्या हरेक त्या आवडीच्या व तुला हव्या वाटणार्या बाबींची कदर करीलच  व त्यांची पूर्तीही . 
तुला देव सर्व सुख देवो , माझेही थोड काय जे पुण्य असेल त्याच शुभ फळ तुला देव देवो हे साकड देवाला माझ

Friday, 12 December 2014

मी आईला कधी  लाडानी गोलू म्हणतो , ती जी काळजी करते त्यामुळे असेच पाणी येते कधी डोळ्यांत , तिच्यावर बाबा चिडले , रागावले की मलाच मेल्याहून मेल्यासारख होत , भावना नको ना दुखवायला पाहीजे , नको ते पाषाण हृदय जे दुखः देईल , नको ती गार्हाणी , नको ते वाभाडे काढलेले , नको ते चिडके बोल, नको तो संताप , नको घरात वाद . असावेत तर निव्वळ प्रेमळ भावनेचा काळजीपोटी वाहिलेला गमतीतलाच भावना न दुखावता केलेला संताप , 
मी आईला कंटाळा वाटू नये म्हणून कोको नावाचे मोठे शब्दकोडे देतो , रमते ती बिचारी. 

बाबा कधी त्यांच्या केसांची बारीक cutting करवून आले की आपसूकच गमतीने हसतो मी गालातल्या गालात , कारण छोटे बाळाचेच वाटते ते त्यांचे डोके , आणि ते पेपर वाचत असले  की त्यांच्या मानेवरील फुगीर गादीवर गमतीत बोट फिरवून गम्मत करतो मी , ते गमतीत रागाने पाहतात , मला खूप हसायला येत .

मला आयुष्यात हे हसरे क्षण गमवायचे नाहीत ,

आईच युटरसच operation झाल १९९३ ला सांगली ला तर मी रडलो पण चेहरा लपवत रडलो , तिला सलायन लावलेलं पाहील तर , दिसलो कोणाला रडताना मी तर सांगितलं त्याना की डोळ्यात काहीतरी धूळ गेली ,

Wednesday, 10 December 2014

तुझी आलेली एकही हसरी स्माईलीण मी डीलीट केली 
 नाही कारण मला तेच तुझ  हास्य सदोदित ठेवायचंय, 


,बंडू मामा बिचारे २७ जून २०१४ ला रविवारी आम्ही 
आलो तर पावसात भिजत बालुशाही घेऊन आले , पाय दुखत होते तरी किती प्रेम त्यांच अन हळवा स्वभाव की त्याना गोड काही खाउ घालावच  वाटलं आम्हाला जेवणा सोबत ,माझा उपास मी तोडला कारण कोणाला मनापासून खाउ घालायची इच्छा असली आणि मी जर नाही खात म्हणून नाराज केल असत तर तुमच मन किंचित दुखावलं असत भावना नाराज केल्याने आणि त्याने मला जास्त त्रास झाला असता 

ती माझा मोबाईल पावसात  भिजू नये म्हणून तुमच्या  फ्रीजमध्ये कोथिम्बीर घालून ठेवलेली कोथिम्बीर काढून  मला   दिलेली पिशवी आजून जपली  आहे कायम जपण्यासाठी कारण ती मायेची आणि निर्मळ प्रेमाची मामीनी दिलेली आठवण आहे  ,

जीवन ही एक  पिशवीच तर आहे एक सुख -दु:खानी भरलेली , आपल मन ही एक पिशवीच तर  आहे अनमोल आठवणींची 

  ,माझे डोळे जाताना भिजलेले थोडे ,पाणावलेले…  पण पावसानी साथ दिली बाहेर पडणारया अन ते करुणामय अश्रू लपले गेले ,

,मी तुला  शनी चालीसा या करताच दिली की मला जो साडेसातीत त्रास झाला तो तुला होऊ नये  ,
 आणि तुझ्या सारख्या निर्मळ मनाच्या देवतेला तर नकोच व्हायला त्रास . 

आणि तुला त्रास तो काय ? तू स्वताहा दुसरयांच्या काळजी ने त्रस्त असतेस असो हेच तुझ विशाल मन 

आम्ही तुमच्याकडे राहिलो ना तेंव्हा मी पाचवीत असेल तर मी BADMINTON RACKET च्या उंचीचा होतो जेमतेम ,सर्व तुझ्या  त्या मैत्रिणी सौ.  कीर्ती ताई वगैरे तुमच्या घरासमोरील रोड वर ते खेळायचे  तर मी लिंबू टीम्बू  असायचो तर सर्व माझ्याशी खेळायला कंटाळायचे  पण  मला बोर वाटू नये तर BADMINTON 
खेळलीस माझ्यासोबत स्वताहा कंटाळलीस तरी ते भाव मला न दर्शवून आनंदी ठेवायला , 

तो सोनु ज्याला चिंटू ही म्हणायचो तो नितनवरे तो किती गोड ससा दिसायचा लहानपणी   

मी जीवन हे सतत अशाच साऱ्याच्या गोड आठवणी   आठवून जगतो 

तो राहुलदादा तर प्रशांत दामलेजी प्रतच निखळ हसवतो  ,मला सर्व चांगल दिलयस  देवा तू ,मला काही द्यायचच आजुन  तर हेच की  सगळे आनंदी ठेव ,ज्याने मी मला आनंदी पाहू शकेल ,कारण मलाच एकट्याला सुख मिळाली तर मी ती मनापासून नाही आस्वाद घेउ शकायचो . कोणी WHATS APP  वर मी पाठवलेला जरी जोक परत पाठवला तरी मी त्याला हसरा स्माईली पाठवून दाद देतो हसरी कारण निरागस भावनेने  तो जोक पाठवणार्याला आनंद व्हावा . 


MAN AS DE RE DEVAA PLEASE KEE WAACH TITLE KHAALEE

मन अस असो की जेंव्हा तू नाराज झालीस तर तुला हसवायला विनोद सुचो ,
मन अस असो की जेंव्हा तुला काहीच सुचत नसेल तर माझ्या मनात SOLUTION मिळो त्यावर 
मी तुला हसवाव , काही सांगून मन रिझवाव अशी बुद्धी मिळो ,
दुखः हा शब्दच मिटवो सारयाच   अस मन मला असो  
मी समजून घेणारा असो , मी समजावणारा असो पण जो ही असो  आवडणारा नसोही ,पण मी विश्वासाचा असो. 
आवडी निवडी हरेकाच्या असो सात्विक ज्यायोगे सगळ चांगल होईल . 
चेहऱ्यावर तेज फेअर & लव्हली किंवा कुठल्या  क्रीमचे नसो माझ्या चेहरयावर  तर ते सर्वाना आनंदी करवून मिळालेल्या मानसिक आनंदाने आलेले असो 

कधी कोणाच्या भावना कोणाकडूनच ना दुखो

मी WHATS APP वर हरेका च्या मेसेजला याकरता  प्रतिक्रिया देतो , वाचला असला मेसेज तरी त्याच कौतुक करतो कारण त्या व्यक्तींनी आपल्याला हासायाला याव त्यायोगे  या ह्या उद्देशाने तो मेसेज एका निर्मळ मनाने पाठवला असतो तर त्याची कदर करायला नको? 
वेळ कोणी द्यावा अस अजिबात नको देवा तर  मला मनापासून बोलाव वाटेल लोकाना  असे लोक संपर्कात आण ,

मला SALARY ,पे  PACKAGE नी मोठ नको करू कारण अर्धा वीत पोटाला जेवायला लागतच  ते किती ? आणि  सर्वांच्या पोटाला त्यांच्या आवडीचे पदार्थ खाउ घालून त्यांनी त्रुप्ती अन आनंदाचा ढेकर दिला की मला आनंद व्हायला येत कोण माझ्याकडे तसही दुर्दैवाने  ? 


फार यश नसलेल्याला एक तर समाज टाळतो नाहीतर तो समाजाला


मला खुप बोलायचंय ,मन मोकळ करायचंय , कोणाच्या भावनाही समजून चालायचंय , सर्वाना आनंद देऊन त्यातच स्वानंद मानून खरया अर्थी हे जीवन जगायचंय , मला नको ते जे काही काळाने संपेल ,जगायचंय मला अस की मेलो तरी उरायचंय , पुतळे नको मला माझे ,तर माझी देव करवून घेईल ती सत्कार्य कायम होत रहात असलेल पहायचंय ,


स्वर्ग मेल्यावर दिसतो हे माहीत आहे आपल्याला पण जिवंतपणी ही चांगल सदवर्तन केल ,कोणाला कोणाचे मन न दुखवता ,पाप न करता खळाळून हसवायचंय ,मला नको काही फक्त सर्वाच्या चेहर्यावर हास्य पाहायचंय , मला सर्वाना पाहायचंय ,



देवा का रे कोणाला दुखणी ?का रे कोणाला व्यंग ? का तू गतजन्मीच्या भोगांच्या नावाने छळ लावतो कोणाचा ? ह्या जीवनात समाधान अन शांती स्व - स्वार्थ साधण्यानेच होते तर त्याला आधी प्रेमाचे नाव देऊन लोक   बदनाम का करतात ? हा जन्म संपला की परत जन्म मिळतो का हे आम्ही अजाण काय जाणू परमेश्वरा पण भोग भोगायला नव्याने जन्म देण्याआधी तू कोणाच्या मनाला कु विचार करणारी वाईट विचारांची मायक्रो चीप का दिलीयस मनात ? 


दोन मने असतात म्हणे हरेकात ,एक हो म्हणणार ,दुसर नाही सांगणार …पण जे न करायला हव तेच मन का करवून घेत शरीराकडून ? का ह्या मेंदूवर ताबा न रहावा असे काहींचे होते ?



मी तर फार पापी आहे ,  मूर्खपणाने कित्त्येकांच्या भावना दुखवून गेलो असेल , त्याची जाणीव मला होऊन मलाच त्रास होतो मनाला खूप , कित्ती जणांच्या मेसेजच जणू पोस्ट मोर्टम करतो माझ्या COMMENTS रूपी कैचीने . 


तुझ्या ही भावना कमी का दुखावल्या मी ? तुला पण अनसेफ वाटाव असा उर्मट बोललो असेल ना ? साडेसातीत बुद्धी च फिरली माझी , पण मी किती रडलो माझ मला माहितीये , मी त्या दिल चाहता है PICTURE च्या टाईम टेबल (सोनाली कुलकर्णी च्या पहिल्या विक्षिप्त BOYFRIEND सारखा ABNORMAL  वागलो ) पण तुझे एक न एक मेसेज जतन केले कारण - आय थिंक युवर ALL मेसेजेस आर जस्ट लाईक as an answers ऑफ godess for मी ,

Tuesday, 9 December 2014

तुझ्याशी बोलायची काय गरज मला ? माझ मन बोलत न स्वता:शीच आणि ते काय तुझ्याहून वेगळय?

मला जे सुचल , जे मी कधी कुठे न वाचल पण जे मनानीच बोलल, मनानीच वाचल आणि मनानीच टाइप करवल.


माझ्या काळजीपोटी स्वता:ला acidity असूनही  आराम न करता , मला बोअरसम न वाटावं याकरता गप्पा केल्यास माझ्याशी ,
मला त्याच रात्री ९ नोव्हेंम्बर ला रात्री मी सुखरूप तर पोहोचलो ना रेल्वेत?
 ही काळजी तुम्हाला सतावली अन call केलास मला

तुम्ही पण जेन्व्हा मुंबईला परत जात होता ना औरंगाबाद वरून आपली आंबेजोगाई तिर्थयात्रा केली तेंव्हा मी, त्या नीताची स्लीपर कोच बस निघाली तेंव्हा संदीप  खरे च हे भलते अवघड असते गाण माझ  मन   गुणगुणून गेल 

 मी केलेली प्रार्थना फळली न ? त्या तुझ्या १८ november sunday पुणे ते मुंबई कोन्डूस्कर बस सारखी ती उजवी डावी होत नाही ना धावली ?

आपल्या मनाच्या चांगुलपणाच प्रदर्शन करणारा / करणारी कधीच खरे प्रेम करू शकायची नाहीत , कारण प्रेम जर खर असेल तर ते जस आहे तस तडजोड न करता स्वीकारण्यात आहे, एका निर्मळ आणि ठोस विश्वासाने जो विश्वास तुटेल अशी  शंकाच जिथे नसेल आणि तुटला  तर श्वास असूनही कोमात असल्याचीही जाणीव असायला मन असणार नाही इतक ते मनाच झालेलं वाईट मरण असेल जे कोणीच पचवू शकत नाही 

सुचवून एखाद्याला जिंकण्यापेक्षा एखाद्याच्या आपल्याविषयी चांगल सुचण्यात आपण असावं हेच प्रेम आहे

प्रेम हे बाह्य मनाला नव्हे तर अंतर्मनाला , आत्म्यातील परमात्म्याला होण हेच प्रेम आहे

प्रेम हे हृदयात किंवा मनातच नसत केवळ ,तर ते रक्तातच असावं लागत

प्रेयसीचा फोटो पाहून / प्रियकराचा फोटो न्याहाळून कल्पना करणारे कधीच खर प्रेम टिकवू शकायचे नाहीत कारण प्रेम हे डोळ्यांतून मनात उतरलं तर ती आवड असते , आकर्षण असते , प्रेम तर मनोरूपी डोळ्याना जाणवत आणि जाणवतच रहात

ज्याला अंत असेल ते प्रेम नाहीच

घटस्फोटांनी शरीर , मन, कुटुंब दुरावून सावरतीलही पण जे सावरतील ते कधीच खर प्रेम जाणलेली नसतील किंवा जाणूनही परत प्रेमाच्या वाटेला ही जाणारी नसतील …

घटस्फोट एकमेकांच्या मनालाही सावरवतील पण दिल्या  घेतल्या शब्दाना अनाथ करवून जी कधी वचन नव्हतीच 

मानवी स्वभावच तो विचित्र , जो बैल जी गाय त्याला शेतात उत्पन्न मिळवून देतो , देते ती गाय भाकड झाली वा तो बैल म्हातारा झाला की खाटकाला विकताना त्याला काही लाजही वाटत नाही

माझ्या लेखी मी जीवन जगलो हे मी ठासून तेंव्हाच प्रतिपादन करू शकेल जेंव्हा मी  -

एखाद्या अनाथाला तो / ती अनाथ नसल्याची जाणीव करवून देऊन आनंदी करवू शकलो , अन  त्याच्या मनापासून त्याला / तिला हसवू शकलो तर मी जगलो .

एखाद्या गरजूला शालेय , महाविद्यालयीन गरजेच्या नोट्स देऊ शकलो

भुकेलेल्याला अन्नच नाही तर ज्याला जो पदार्थ खायची इच्छा  झाली तो पदार्थ त्या व्यक्तीला देऊ शकलो ,

आई-बाबांची आवडती  सिरीयल त्याना tv  वर लाउन देऊन त्यांच्या डोळ्यांतील आनंद पाहून माझ्या डोळ्यांत जी आनंदाची आसव येतील ती अनुभवू शकलो .

कोणाला त्याच , तीच प्रेम  जर खरच कायम राहावं अशी इच्छा ठासून असेल त्या एकमेकाना नैतिक अन सुंदरश्या नात्यात कायमस्वरुपी  गुंफवू  शकलो .

कोणाच्या बुद्धीच कोडकौतुक इतरांकरवी व्हावं याकरता जर त्यांनी गमतीत माझा पच्का  करवून माझ हास उडवून जरी घेउ शकलो अन त्याना आनंदी  करवू शकलो ,

आपला मनातील आनंद हा दुसरयाच्या आनंदात साकार करवून निर्लेप मनाने जगू शकलो .

कोणाच्या त्रस्त मनाला आनंदी करवू शकलो तर

अशी  इत्त्यादी तर अमर्याद सात्विक कारणं आहेत व राहतील ,

कारण मला जगताना जगण्याची अनुभूती तर मिळवायचीच आहे पण मी मेल्यावरही जगावं फक्त आदर्शांच्या रूपाने (माझ्या पुतळ्यांच्या रूपाने नव्हे ) जगावं हीच इच्छा

जर विचारलं तू माझ्या मनाला की - माझ्याशिवाय जगू  शकशील?

सर्व देवताना स्मरून मनोदेवतेच ही माझ्या उत्तर अस मनापासून, अंत:करणापासून   असेल जे सारखा सात्विक विचार करत ते  की -

जर फक्त श्वसन क्रिया चालू राहाण  हेच जर तुझ्या लेखी जिवन असेल तर जगू शकेलपण पण  त्या जीवनाला अर्थ नसेल कारण माझ मन कोमात गेल असेल , शरीर जरी ठीक राहील तरी … आणि मन दुखी राहील तर तब्ब्येतीनेही  खंगुन गेलो असेल

पण कोणाला मिळवण म्हणजे ती व्यक्ती आपल्यासोबत नसली तरी चालेल पण ती जिथे असावी आनंदी असावी कारण आपल्या पेक्षाही कोणी काळजी करणार मिळो तुला मग जो माझ्यासारखा त्रासदायक , इमोशनल करणारा कार्टुन नसेल तो

कशी गम्मत आहे नं की ; आपल मन हे आपल्याला चालवत की आपण मनाला? हे आपल्यालाच जाणून घ्यायलाही आपल्या मनाचाच आधार घ्यावा लागतो

लग्न आणि प्रेम -
खर तर ज्या व्यक्तीशी एक  संस्कार अर्थात  लग्नाच नात जोडतोय त्या व्यक्तीला त्याची स्वता:च्या मनातील आवड प्रधान   वाटू लागते आणि तो / ती त्याच जाणीवेला प्रेम असे गोड नाव देऊन त्या लग्नाच्या बेडीत   अडकतो , खर बंधन असेल तिथे प्रेम कस असू शकेल? ती किंवा तो जोपर्यंत ऐकण्यात असतो तोपर्यंतच खर तर हा सारा खेळ ,
प्रेम विवाहात तर आधी एकमेकांसाठी जीव दयायची आरोळी ठोकणारे लग्नानंतर जीव नकोसा झालाय असे म्हणताना दिसतात , याला कारण प्रेम हे कधी भावनांवर केल तर ते टिकल असत ना ? मुळात सौंदर्य , नोकरी , चाल, शालीनता , स्वभावाला साजेशीच अशा जिथे अटी पाळायची बंधन असतात ती लग्न  झाल्यावर जोपर्यंत पाळली जातात तोवर गोड बोलायची सगळी स्पर्धा असते ,
सौंदर्य ओसरल तो/ ती जाड दिसू लागली , जिला चवळीची शेंग म्हणून प्रेम केल वा handsome म्हणून प्रेम केल तो / ती कालांताराने भोपळा झाली की नावडू लागतात अन मित्रांत बायकोची बदनामी करत -  घर की  मुर्गी दाल बराबर अस अर्वाच्च्य बोलताना जिभेच हाड ही कुठे गळत हे  कळून येत नाही , हेच का पूर्वी केलेल्या आणा - भाकांच आणि दिल्या घरतल्या वचनांच फलित? ती बिचारी तो कामावरून थकून आला की पाणी - चहा आणेल आणि हा तिच्या भावनांची जराही कदर न करता काय फुळकट पाणी आणल अस बोलून बॉस च नाही तर सहकारयाचा वाद तिच्यावर काढणार , तिलाही मन आहे हा विचार केला तर ? पण आता तिचा कायापालट झालाय ना , आता कुठे ती परी वाटतेय? आता ती बाई झालीय ना ? पण त्या व्यक्तीला हे नाही जाणवत की आपल्या आईला आपल्या वडिलांनी अस  रागवून बोलल तर काय वाटेल ? वा सासरी दिलेल्या बहिणीला जर तिच्या नवरयाने अस झापल तर काय वाटेल ह्याची जाणीव ही शिवत नाही,  स्वार्थ साधण म्हणजे प्रेम मिळवलं अस थोडक्यात गलिच्छ स्वरूप येत चाललय त्या गोड बंधनाला, ना उरला जिव्हाळा ना उरल प्रेम  , उरल ते फक्त अन फक्त मनस्ताप आणि मरण येत नाही तोवर ढकलायच जिवन ,

आपल्यावर जीव ओवाळून टाकावा वाटतो पण आपल्या व्यतिरिक्त इतराना भावना आहेत ह्याची मात्र जाण विसरून हेच का हे बंधन?


एकमेकांशी प्रेमानी बोलून, वागून  पोटाची खळगी भरायची नाही पण मनाला जो आनंद मिळून भुकेचाही विसर झाल्याचा अनुभव येणार जोडप  दुर्मिळच .


मुळात एकमेकांसाठी जगतो? , की एकमेकांकरता जगतो ? की स्वताच्या चांगल्या जगण्यासाठी तिच्या सोबत जगतो ? हेच मुळात स्पष्टीकरण देणारा कोणी भेटायचा नाही ,


मुळात मन वाचणारा डोळा हा शरीराला नसतो तर आपल्याच सात्विक भावनेलाच तो असावा लागतो , तो जर भौतिक भावनेला किंवा तामस गुणाला असेल आणि त्याच द्रुष्टीने पाहील तर प्रेम आंधळ नाही तर स्वार्थी  मनाची आवड जोपासणारी व्यक्ती मनाने अंध आहे हे निश्चित .


प्रेम म्हणजे काय?  तर जी एक न एक भावना ज्यासमोर न बिलगता बोलावी वाटेल ते प्रेम. मुळात प्रेमात दोघ नसतातच , दोघ असतात तर ती फक्त शरीरं , मन नव्हे . कारण मनोमिलन आहे तरच प्रेम आहे , पण मनोमिलन म्हणजे तडजोड करून मी तुझ्यासाठी अस केल , तस केल पण तू काय वागतेस / वागतोस ? असा ज्यात शेवट होतो ते प्रेम नव्हेच ती तर तडजोड ., तो तर सौदा


मनाची दखल घेणारी माणस नशीबानच मिळतात ,ती एकतर आपल्या प्राक्तनात असली तर आपल्याला समजत नाही , जाणीव नसते नाहीतर आपल्या लेखी त्याना काहीच किंमत नसते . 


मुळात कशालाच कोणी कोणाच्या भावनांशी खेळत हेच कळत नाही ,


मुळात जेंव्हा कोणी कोण्या मुलीला म्हणतो की माझ तुझ्यावर प्रेम आहे तर एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे की जिथे प्रेमालगत वर हा शब्द आलाय त्या अर्थी तो वर हा शब्द अप्रत्यक्षपणे सौंदरयावर , तिच्या मिळणारया पैशांवर ,तिच्या आपल्याशी ती सतत नम्रच राहून ,नामात घेईल या स्वार्थावर त्या व्यक्तीच प्रेम जडलेल असत ,खर प्रेम ही तर भावना असते जाणीवेची की मनात सतत एकच ध्येय असत की जिच्यावर प्रेम आहे तिला हरेक रीत्या सतत उत्साही अन  आनंदी कसे ठेवता येईल . 


जर खर प्रेम केलस तर तिला आपल बनवायचा अट्टाहास का? आणि नंतर ती  त्यासमवेत बंधनात अडकली की ह्या जाणीवेत की आता कुठे जातेय ती? ह्या दुर्भावनेत तिच्या मनावर उद्धट बोलायचे अत्त्याचार चालू होतात , तिच्या मनाचा विचारही न करता तो तिला प्रत्त्येक शब्दागणिक बदनाम करायची एक संधी दवडत नाही , चार लोकात तिच्या चुकांचे वाभाडे काढत ,मिटक्या मारत विनोद करून फुशारकी मिरवतो , तिला ग्रूह्लक्ष्मीचा मान देऊ म्हणणारा लग्नानंतर पायातील वहाण असल्यागत संबोधतो ,अशी तिची फसगत केली ह्याचही त्याला काळाच्या ओघात भान राहात नाही , पण ती आयुष्यभर सावलीचा आधार देत सोबत राहिली ह्याचा पार विसर पडतो त्याला ,  जेंव्हा तो नोकरीवरून यायला उशीर झाला तर सतत काळजीपोटी GALLERYत चकरा मारणारी आणि तो सुखरूप घरी आला की गपचूप  देवासमोर  साखरेचा नैवेद्द्य ठेवणारी त्याला दिसत नाही ,


प्रेम हा शब्द वापरून त्याच विडंबनच होत आलेलय आजतागायत ,प्रेम हा शब्द वापरून तिच्यासोबत स्वार्थाचे सारे भोग भोगून झाले की ती व्यक्ती त्याला कंटाळवाणी होऊ लागते हेच मानवाचं रक्तातल लक्षण आहे, बबलगमच्या उपमा ही आजकाल देण्याची FASHION रूढ झालीय आता आणि त्याला पुरूषार्थ गाजवल्याच द्योतक समजू लागतात  याहून समाजाची   आजुन काय घसरण व्हायची बाकी राहिलीय ? जो जास्त मुली फिरवतो त्याला लकी समजतात , वा रे वा समाज आणि त्यात अजूनही जगणारे आपण , आभाळ तर सतत फाटलेलंच होत समाजाच अन आहे . 



जो खर प्रेम करेल त्याला वाटेल जे वाचल जोक पुस्तकात ते जोक तिला सांगावेत जे तिनी वाचले नसतील 

क्षणोक्षणी तिच्या हास्यानी तिच्या गालांवर आलेली ,  आणवलेली चंद्रकोर रूपी खळी आपण स्वभावाने तिला आनंदी ठेऊन सदोदित   मेंटेन करावी 

ती  म्हातारी होऊन वय वाढल तरी सुरकुत्या पडायच्या नाहीत इतक हसवाव 

ती चिडली तरी तिचा वर्स्ट मूड सांभाळून घ्यावा 

कारण ती ही त्याच निर्मळ भावनेने आपल्यावर , आपल्या घरच्यांवर जीव ओवाळून टाकते
ही खात्री आहे ना मनाची 


तिला महागड नेकलेस हवाय पण आपल्याला कर्जात ढकलून नव्हे तर आपणच तिच्या सौंदरयाला न्याहाळाव अन तीच  कौतुक  कराव याकरता , 

तिला CANDLE LIGHT  DINNER ला नेल तर अंधारात HOTEL वाल्यांनी भाजीत कांही तिसरच तर नाही ना मिसळल ही खात्री आधी करावी प्रसंगी प्रयोग शाळेतील उंदराची भूमिका बजावत 

पण तिने कधी आपल्याला सोडून जाउ नये, ना आपण तिला,  काही अपरिहार्य कारण वगळता जाव पण ते ही मोबाईलवर  तिच्या संपर्कात राहून ,   आणि इतर काही



कुठेतरी  मनातील विचारांना वाट मोकळी 
___________________________________

मी मला जस सुचल तस टाइप  करत जाणार आहे ,  खूप काही शेअर करावस वाटत , आपल मन हे कोणापुढे  तरी  ज्याला आपली खुप   काळजी असेल त्यासोबत बोलावस वाटत पण दुर्दैवाने त्या व्यक्ती  वा त्या एकतर आपल्याला कधी समजून घेउ इच्छित नसतात , नियती ही अशीच असते जे ज्याला नको वाटत  तेच नेमक त्याच्या पुढ्यात आणून ठेवते , आणि नशीब म्हणून आपण दु:ख गिळायची सवय  करू लागतो . हे जिवन पाहील तर किती आनंदात जगलीय आपली गत पिढी , न  हेवेदावे ,ना वाद  , असला तरी काही काळापुरता , माणस दुरावली तर प्रेम , आपुलकी आजून वाढते अस म्हणतात पण ती न जाणे का इतकी दुरावतात की ती एके काळी आयुष्यात होती ह्याचाही कालौघात विसर पडतो , वा रे जिवना तुला जगताना स्पर्धाही आहे, स्पर्धा जिंकायला आप्तस्वकीयांचा दुरावाही होतो आणि  मिळाल की त्या ओघात ती माणसंही इतिहासात जमा होण्याइतपत दुरावली जातात यशाची शिखर अजून गाठायच्या भावनाहीन स्पर्धेने त्यात 
ही ईर्ष्या तर ठिकठीकाणी  नडू लागते , मी च बरोबर आणि माझच सारयांनी ऐकावं ह्या  गुर्मीत आज कोणाचेच आवाज येउ नयेत कानी इतक एकाकी पडत चाललोय अन आता तर त्याची सवयही करवून घेउ लागलोयत .

Saturday, 6 December 2014

दिवाळीच्या काळात तू मला २२ ऑक्टोबर २०१४ ला माझ्या मोबाईल प्रमाण वेळेनुसार रात्री ११ वाजून ३८ मिनिटांना ग्रुपवर सांगीतलंस  ना की - "अमेय तू तुझा ब्लॉग का नाही लिहीत ? "
 म्हणून मी हे ब्लॉग्स लिहिणार आहे ज्यामुळे मलापण माझे विचार मांडायला एक हक्काच व्यासपीठ मिळेल आणि कोणाला whats app वर त्रास होणार नाही मी हा ब्लॉग कधीच कोणाला इतराना  सांगायला , इतर कोणाशीच शेअर करायला बनवत नाहीये कारण माझ एक भावना शेअर कराव वाटणार एक एकमेव विश्व तूच , मी मुद्दाम गडद font वापरतोय आणि ह्यूज टेक्स्ट ज्यामुळे तुला डोळ्याना त्रास पडणार नाही , तसही तुझ्या कॉम्प्युटर जॉब वर्क भलेही तो WORK FROM HOME का असेना पण त्यामूळे डोळयांवर ताण जाणवत असेल ना ? असो, मी जस मला वाटलं , जे काही सुचल ते आता यावर शेअर करायला येईल त्यामुळे मलाही डोक्यावर विचारांचा ताण जाणवणार नाही
thank यु व्हेरी मच मला ही आयडीया दिलीस आणि एक गिफ्ट च दिलस , 

प्लिज हं ,माझी शप्पत देत नाही तुला कारण हेच की माझा तुझ्यावर खुप विश्वास आहे ज्याला तू जागशीलच … कि तू कोणालाच ह्या BLOG बद्दल सांगणार , कळवणार नाहीस , PLEASE …. इथे WHATS APP प्रत ना स्माईली ना नमस्काराच्या हाताचे SYMBOLS तसेही स्माईली खरेच भाव दर्शवतात का? 



 , हा विचारमंच फक्त माझ्या मनातील विश्वाशी निगडीत आहे ,म्हणून मी तो तुझ्याशिवाय कोणाशीच शेअर करणार नाहीये कारण मी- 

तू काय कोणीही कसही वागो , टाळो ,मला मूर्ख समजो मी सर्वांशीच चांगल वागायाच ठरवलंय साडेसातीत नियतीचे (नियती इज नॉट हियर ANY GIRL'S NAME ) फटके खाल्ल्यापासून , 

माझा कोणाला त्रास झाला तर देव माझी वाचा घालवो पण , मला ज्या आप्तांसोबत त्याना आनंदी ठेवून त्यांच्या आनंदात हसायचं आहे ते कधी दूर न जावो , माझ मन त्या डॉलफिन सारख संवेदनशील आहे आणि इतरानाही तसच एक मन आहे ही जाणीव देव माझ्या मनात सदोदित कायम ठेवो हीच प्रार्थना .