मला कोणाला कधी दुखवायचं नाही , हरेकाला मन आहे हे मी आधी जाणतो माझ्या मनातील सर्व काही बोलण्या आधी ,
आता तर मी ब्लॉग नाव बदलल तर वाचायला जी एकमेव होती तीही नाहीये त्यामुळे माझ्या मरणानंतर हा ब्लॉग उपराच राहील
माझ मन शेवटी एकटच राहीलं ,
मला एकाही नातलगाने साधी विचारपूस देखील केली नाही की मी ग्रुप का सोडला , कोणाला कोणाशी काही घेण देण नाही इतके सगळे व्यस्त झाले , तसही मी बरच केल की ग्रुप सोडला कारण ती मेसेज डिलिव्हर होऊनही गपचूप नंतर वाचन करत असेलही , माझे मेसेज मी जिला पाठवले ग्रुपवर तिनीच तोंड फिरवल , नाराज असेल ती तर माझा जाच का कोणाला ?
तिला मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील पाठवाव्या वाटल्या नाहीत म्हणजे किती हिणकस वागणूक मला दिली जातेय ,
माझ्या भावनांची जराही किंमत , कदर वाटू नये इतक मी नकोस झालोय ,
पण मी ही चुकतोच अती विचार करून फार अकलेचे तारे तोडत बसतो स्वता:च ,
मी पण किती रडलो हे तो देव जाणतोय , सर्व तो जाणतोय की मी किती दुखात आणि चिंतेत वावरतोय ते ? हरेकाला त्याच दुख मोठ वाटत इतरांपेक्षा
-
पण हे देवा माझ्या बाबाना चांगली बुद्धी कधी रे देशील ?
का आईकडून थोड काही पोळ्या , स्वयंपाक शीळ उरल तर ते तिला उटसुट घालून पाडून हिणकस आणि टाकून बोलतात की तिला डोळ्यात पाणी याव ?
का रे देवा बाबा मला नेहेमी मन दुखवून बोलतात ?
काय चुकलो रे मी ?
मी अजिबात आनंदी नाही रे देवा राहू शकत आहे कारण कोणाच्या शारीरिक वेदना मी नाही रे पाहू शकत ?
का रे देवा ही रोगराई अन ही शारीरिक दुखणी आहेत , भोग आहेत ह्या हरेक सजीवाना ? का रे हे मन दिलस की जे नेहेमी मन मारून किंवा मनाला उलट सुलट बोलणी सहन करवून जगवाव लागतंय ?
का त्या हरेक सिनियर नी कंपनीत शिपाई काकांवर तोंडसुख घेऊन त्याना दुखवाव ? त्याना बिचारयाना किती वाईट वाटत असेल ?
ते त्यांच्या बापाच्या वयाचे आहेत ,
देवा मी पोथी पुराण का रे वाचली ? की जिच मी मन दुखवल अस तिला वाटतंय तिला ती हरेक सुख मिळो , हाच उद्देश असायचा हे तू जाणतोस ना रे देवा ? नसो लागल्यास ती माझ्या सोबतीला पण निदान ती बोलून तर मला माझ्या चुका दाखवू शकली असती ना ,
मी का रे देवा ह्या अबोल्याची शिकार होतो नेहेमी त्यापेक्षा मला इबोला रोग जडवायचा असतास ज्यात मला शारीरिक वेदना होतील ज्या मी करू शकेल सहन पण मानसिक नाही ,
देवा मला मरण दे रे पण माझ्या आप्तांचा, तिचा अबोला नको , आणि एक उपकार प्लीज कर की मला परत जन्माला घालू नकोस.
का रे देवा ही अशी जीवसृष्टी रे रचलेली तुझी ज्यात मोठे प्राणी लहान प्राण्याना भक्षण करतात? ससा किती गोंडस , गरीब त्याला हिंस्त्र पशूंच भय ? का रे देवा बिचारा उंदीर मांजरीच भोजन असत? मांजर स्वता: आणि तिच्या इवल्या पिल्लाना कुत्र्यापासून वाचवते , का रे देवा हरेक जण संकटात ?